Breaking

Crime in Wardha : भाड्याच्या घरातून फसवणूकीचे रॅकेट !

Fraud racket from rented house : कंपनीकडून बोलत असल्याचे सांगून लुबाडले

Wardha भाड्याच्या पाच खोल्यांच्या घरातून बेरोजगार सुशिक्षीत युवकांना नोकरीचे आमीष देत फसवणूकीचे भारतभर रॅकेट चालविणाऱ्या दोघांना पोलिसांनी अटक केली. त्यांच्या ताब्यातून १ लाख १९ हजारांचया रोख रकमेसह १ नोटपॅड, ८ मोबाईल, ३ लॅपटॉप, ३ एटीएम कार्ड असा २ लाख ४२ हजारांचा मुद्देमाल जप्त केला.

कुमार मदनमुरारी सिंह (३३ रा. कुरथॉल, पटना), रोशनकुमार अखिलेशकुमार सिंह (३० रा. पटेल नगर, पटना, बिहार) अशी अटक केलेल्यांनी नावे आहे. सुरज धनराज जोध रा. आष्टी यांना नोकरी डॉट कॉम या संकेतस्थळावर महिंद्रा अॅन्ड महिंद्रा कंपनीमध्ये जी.टी. इंजीनिअर या पदाच्या जागा रिक्त जागेसाठी जाहिरात दिसली. यासाठी त्यांनी ऑनलाईन अप्लाय केला.

Dr. Pankaj Bhoyar : २०० शेतकऱ्यांना मिळणार आधुनिक शेतीचे धडे !

कंपनीकडून बोलत असल्याचे सांगून वेगवेगळ्या कारणास्तव १ लाख ३८ हजार ४५० रुपये भरायला सांगितले. मात्र पैसे भरूनही नोकरी न लागल्याने त्याने सायबर पोलिसात ११ नोव्हेबर येथे सायबर पोलिसात गुन्हा नोंद केला होता.

ताब्यात आरोपींचा तांत्रिक पद्धतीने तपास केला असता आरोपी बिहार राज्यातील आहेत. सद्या वाराणसी, उत्तर प्रदेश येथे वास्तव्यास असल्याचे निष्पन्न झाले. त्याच्या शोधात पोलिसांचे एक सदर पथक रवाना केले होते. ४ दिवस आरोपींची तांत्रिक व गोपनीय पद्धतीने माहिती घेत छापा घातला असता कुमार मदनमुरारी सिंह, रोशनकुमार अखिलेशकुमार सिंह यांना शांतीनगर कॉलोनी वाराणासी, उप्र) येथेून लोकांची फसवणुक करत असताना रंगेहात अटक केली.

Central Jail : गरीब कैद्यांच्या जामिनाची रक्कम सरकार भरणार

आरोपींनी ५ खोल्यांचे घर भाड्याने घेतले होते. तेथून संपूर्ण भारतभर फसवणुकिचे गुन्हे करत होते. त्याच्या ताब्यातून १ नोटपॅड, ८ मोबाईल, ३ लॅपटॉप, ३ एटीएम कार्ड व नगदी १ लाख १९ हजारांची रोख असा एकुण २.४२ लाखाचा मुद्देमाल जप्त करित गुन्हा उघडकीस आणला. आरोपींकडून महाराष्ट्रासह इतर राज्यांतील गुन्हे उघड झाले आहेत. आणखी गुन्हे उघड होण्याची शक्यता आहे.