Leader of Shinde Shivsena gave false promise of job in railways : शिवसेना शिंदे गटाच्या नेत्याने केली बेरोजगारांची फसवणूक
Amravati राजकीय पुढाऱ्यांचे स्वतःचेच भविष्य निश्चित नसते. त्यातही गावपातळीवरील नेत्यांना तर पदांचीही खात्री नसते. अशात सत्तेत असलेल्या शिंदे गटाच्या नेत्याने नोकरी लावून देण्याचे खोटे आश्वासन दिले. आणि बेरोजगारांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. शिवसेना शिंदे गटाच्या अंजनगाव सुर्जी येथील शहर प्रमुखाने नोकरी लावून देण्याच्या नावाखाली बेरोजगारांची दीड कोटीने फसवणूक केल्याचे उघडकीस आले आहे.
रेल्वेत नोकरीचे आमिष देऊन तब्बल १७ युवकांची एकूण १ कोटी ५६ लाख रुपयांनी फसवणूक केली. या प्रकरणी १४ जानेवारी रोजी अंजनगाव सुर्जी पोलिसांनी शिवसेना शिंदे गटाचे शहर अध्यक्ष योगेश ऊर्फ मुन्ना इसोकार यांच्यावर गुन्हा दाखल केला. त्यांच्यासह चौघांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. फिर्यादी मंगेश वसंतराव हेंड (३८, रा. रामटेकपुरा, अकोट) यांच्या तक्रारीनुसार, मंगेशची योगेशसोबत डिसेंबर २०२१ ला ओळख झाली.
Anil Deshmukh on CM Devendra Fadnavis : वाढत्या गुन्हेगारीकडे फडणविसांचे दुर्लक्ष
एका माजी आमदारामार्फत रेल्वे विभागात नोकरी लावून देतो. त्याकरिता एकूण दहा ते पंधरा जण लागतील. तुम्हाला खर्च करावा लागेल, अशी बतावणी मुन्नाने केली. मंगेशने त्याचे काही नातेवाईक व मित्रांना सोबत घेतले. मुन्नाच्या सांगण्यावरून परतवाडा येथील विलास गोवर्धन जाधव (रा. परतवाडा), श्रीकांत बाबूराव फुलसावंदे (रा. राजुरा) यांच्याकडे काही रक्कम देण्यात आली.
कोटक महिंद्रा बँकेच्या त्रिमूर्तीनगर (नागपूर) येथील खात्यात आरटीजीएसद्वारे ही रक्कम जमा केली. भायखळा येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मेमोरियल सेंट्रल रेल्वे हॉस्पिटल येथे युवकांची वैद्यकीय तपासणी आटोपली. त्यांची लवकरच रेल्वे अधिकाऱ्यांसोबत अंजनगाव सुर्जी येथे भेट घालून देणार असल्याचे सांगण्यात आले.
CM Devendra Fadnavis, Nagpur Police : लहान भावापुढेच मोठ्या भावाचा निर्घृण खून!
त्यानुसार २३ जानेवारी २०२२ ला मुन्नाने अंजनगाव येथे एका फ्लॅटवर नेऊन श्रीकांत फुलसावंदे, विलास गोवर्धन जाधव (रा. परतवाडा), मॉन्टी ऊर्फ मेघराजसिंह चौहान ठाकूर (रा. मसाजगंज, अमरावती) यांच्यासोबत रेल्वे अधिकारी म्हणून भेट घालून दिली. त्यांनी सर्वांची कागदपत्रे पाहिली. त्यानंतर सर्वांनी मुन्नाच्या घरी आणखी रक्कम दिली. विनापरीक्षा थेट जॉइनिंग लेटर दिले जाईल, अशी बतावणी करण्यात आली.
परीक्षा देण्याची गरज नाही. आम्ही तुमची ऑर्डर काढतो. त्यानुसार सर्वांच्या पत्त्यावर जॉइनिंग लेटर घरी पोस्टाने पाठवले गेले. तथापि, सर्वांनी मुंबई गाठली त्यावेळी जॉईन करून घेणारे अधिकारी सुट्टीवरून परतल्यानंतर जॉईन करण्यात येईल, असे सांगितण्यात आले. एक-दोन महिन्यानंतर युवकांनी पुन्हा फोन केला. तेव्हा ज्या अधिकाऱ्याला पैसे दिले आहेत, त्याची बदली झाली आहे. थोडे थांबावे लागेल, असे सांगण्यात आले.
त्यानंतर मुन्ना फोनवर उडवाउडवीची उत्तर देत गेला. तो घरी भेटतही नव्हता. त्यामुळे आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच युवकांनी मुन्ना इसोकार वगळता इतर तिघांना गाठले. मात्र, चौघांनीही तुम्हाला जे करायचे आहे ते करून घ्या. आमचे सरकार आहे, अशी धमकी देत शिवीगाळ केली व जिवे मारण्याची धमकी दिली. त्यानंतर फसवणूक झालेल्या युवकांनी अंजनगाव पोलिस स्टेशन गाठले.