Congress leader Vijay Wadettiwar makes serious allegations against Fadnavis, Shinde, Pawar : लुटीचे हिस्सेदार सत्ताधारी तिन्ही पक्षांचे प्रमुख
Nagpur : गडचिरोली जिल्ह्यात औद्योगिक क्रांती होत आहे, असा केवळ भास सत्ताधारी पक्षांकडून केला जात आहे. प्रत्यक्षात येथे औद्योगिक क्रांतीच्या नावावर खनिजांची लूट सुरू आहे. याशिवाय जेएसडब्ल्यू जिंदालच्या कारखान्यासाठी शेतकऱ्यांना भूमिहीन करण्याचाही डाव आहे. लुटीचे हिस्सेदार सत्ताधारी तिन्ही पक्षांचे प्रमुख आहेत, असा गंभीर आरोप काँग्रेसचे विधीमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे.
यासंदर्भात बोलताना वडेट्टीवार म्हणाले, जेएसडब्ल्यूची मोठी इंडस्ट्री वडसा तालुक्यात प्रस्तावित आहे. यामध्ये १७४ हेक्टर सरकारी जमीन आहे. तर २३०३ हेक्टरवर कारखाना होणार आहे. सद्यस्थितीत सेक्शन सहा सुरू करण्यात आला आहे. याची संपूर्ण माहिती घेतली असता एकूण ८ हजार एकर ही जागा असणार आहे. मुळात ही जागा घेताना वडसा तालुक्यातील कोंडाळा गावाची ८८१ एकर जागा यामध्ये जाणार आहे. कोरोडी ३७५ हेक्टर, वडसा १०३, नैनपूर ४४४, कुळशी ६, तर वडेगावची २६९ हेक्टर जमीन जाणार आहे. ही जमीन प्रकल्पासाठी घेताना ८ गावे बाधित होणार असून त्यांचे पुनर्वसन करावे लागणार आहे.
North Maharashtra University : महाराष्ट्रात तयार होणार १० हजार सायबर सुरक्षा तज्ज्ञ !
इंडस्ट्रीला आमचा विरोध नाही. विकासासाठी ती झालीच पाहिजे. पण विकासाच्या नावावर राजकीय आणि औद्योगिक मंडळी आमच्या लोकांना उद्ध्वस्त करत आहेत. सरकार जे दर देत आहे, ते पुरेसे नाही. जमिनीचे दर एक कोटी रुपये प्रति हेक्टर द्यावे. जेणेकरून येथे शेतकरी उद्ध्वस्त झाल्यानंतर दुसरीकडे स्थायिक होऊ शकला पाहिजे. याशिवाय प्रत्येक दोन एकरच्या मागे एक नोकरी द्यावी, हीसुद्धा आमची मागणी आहे, असे वडेट्टीवार म्हणाले.