Surjagad production capacity is going to increase :
सुरजागड लोहखनिज उत्पादन क्षमता 10 वरून 26 दशलक्ष टन
Gadchiroli: गडचिरोलीच्या सूरजागड लोह खाणीतील उत्खनन क्षमतेच्या वाढीला पर्यावरण विभागाने मंजुरी दिली आहे. यासाठी खाण परिसरातील 900 हेक्टर जंगलावरील झाडे तोडण्याला वन्यजीव संरक्षणाच्या अटीसह परवानगी देण्यात आली आहे. पर्यावरणवाद्यांनी याला विरोध करायला सुरवात केली आहे. या निर्णयामुळे 937 हेक्टर वनजमीन खाणकामासाठी वापरली जाणार असून 1.23 लाख झाडांची कत्तल होणार आहे.
या निर्णयामुळे इतक्या मोठ्या प्रमाणावर वृक्षाची कत्तल होणार आहे. सोबतच या भागात असलेला ‘टायगर कॉरिडोर’ पण धोक्यात येईल, अशी तक्रार पर्यावरणवाद्यांनी केली आहे. दोन महिन्यांपूर्वी लॉयड मेटल्स कंपनीची उत्खनन क्षमता 10 दशलक्षवरून 26 दशलक्ष टन इतकी करण्यासाठी पर्यावरण विषयक जन सुनावणी प्रशासनाकडून घेण्यात आली. यावेळी केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाच्या कोळसा नसलेल्या खाण प्रकल्पांवरील तज्ञ मूल्यांकन समितीने लॉयड्स मेटल्स अँड एनर्जी लिमिटेडला. गडचिरोली जिल्ह्यातील सुरजागड खाणीतील लोहखनिज उत्पादन अधिक करण्यासाठी पर्यावरणीय मंजुरीची शिफारस केली होती.
Nagpur crime : प्रेयसीच्या चितेवर उडी मारणारा तरुण अत्यावस्थ!
नंतर काही आठवड्यांतच पर्यावरण मंत्रालयाने लॉयड्स मेटल्स अँड एनर्जीच्या ‘अयस्क-वॉशिंग प्लांट’साठी 900 हेक्टर जंगल परिसरातील एक लाखांपेक्षा अधिक झाडे तोडण्यासाठी परवानगी दिल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. नक्षलग्रस्त गडचिरोली जिल्ह्यात गेल्या तीन वर्षांपासून सूरजागड टेकडीव लोहखनिज उत्खनन सुरु आहे. लॉयड्स मेटल्स अँड एनर्जी लिमिटेड कंपनीला 348 हेक्टर परिसरातील खाणीचे कंत्राट देण्यात आले आहे. या टेकडीवर जवळपास पाच खाणपट्ट्यांच्या कंत्राटाची निविदा प्रक्रिया सुरु आहे. हा परिसर महाराष्ट्र छत्तीसगड सीमे पर्यंत
विस्तीर्ण जंगलाचा भाग आहे.
Nagpur Municipal Corporation : काय सांगता? नागपूर महानगरपालिकेचं कौतुक होतयं?
या निर्णयाला आदिवासांनी पण कडाडून विरोध केला आहे. या निर्णयमुळे 937 हेक्टरवरील जंगल नष्ट होणार आहे. स्थानिक पर्यावरण आणि आदिवासींच्या जीवनमानावर गंभीर परिणाम होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. या प्रकल्पामुळे या परिसरातील 30 ते 40 गावांवर थेट परिणाम होईल. या भागातील 50 हजारांहून अधिक आदिवासी विस्थापित होण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.
गडचिरोली जिल्ह्यात सुरजागड येथे लँड्स मेटल नामक कंपनी वाढीव उत्खननासाठी राज्य सरकारकडे परवानगी मागितली होती. राज्य सरकारने पंधरा दिवसात हिरवा कंदील देत सुरजागड महाराष्ट्र- छत्तीसगड सीमावर्ती भागात असलेल्या घनघाट जंगलातील वृक्ष तोडण्याची अनुमती दिली. हा प्रकल्प नक्षलग्रस्त भागात आहे. जंगल नष्ट होत असल्याची भूमिका घेऊन आदिवासी विरोध करीत आहेत.मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे अनेक याचिका दाखल आहेत