Breaking

Gajanan Maharaj Prkatdin : महाप्रसादाने कट्टर विरोधकांना आणले एकत्र!

Mahaprasad brought the staunch opponents together : राजकीय समीकरणांना नवी कलाटणी?

Buldhana राजकारणात वैर टिकत असले तरी समाजकारणाच्या व्यासपीठावर नेते सोबत येतात. याचा प्रत्यय पुन्हा एकदा आला. संत गजानन महाराज प्रगट दिनानिमित्त येळगाव येथे महाप्रसाद वाटपाच्या कार्यक्रमात कट्टर राजकीय प्रतिस्पर्धी असलेले आमदार संजय गायकवाड, माजी आमदार विजयराज शिंदे आणि शेतकरी नेते रविकांत तुपकर एकत्र आल्याने चर्चांना उधाण आले आहे.

नोव्हेंबर २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत आमदार गायकवाड यांनी विजयराज शिंदे यांच्यावर ५ कोटींची डील आणि महाविकास आघाडीला गुप्त पाठिंबा दिल्याचा गंभीर आरोप केला होता. लोकसभा निवडणुकीच्या काळातही गायकवाड आणि तुपकर यांच्यात तीव्र संघर्ष दिसून आला होता. एकमेकांवर वैयक्तिक आरोप-प्रत्यारोप करणारे हे नेते मात्र आज एकाच रांगेत उभे राहून महाप्रसाद वाढताना दिसले.

Mumbai Crime Branch : उपमुख्यमंत्री शिंदे यांना धमकी, बुलढाण्यातील दोघे अटकेत

या कार्यक्रमात गायकवाड, शिंदे आणि तुपकर यांनी एकत्र महाप्रसाद वाटला. गायकवाड यांनी हातात घेतलेल्या पोळीवर शिंदे यांनी भाजी वाढली, तर तुपकर यांनी त्याच्या शेजारी बुंदी ठेवत आपली उपस्थिती नोंदवली.गेल्या काही वर्षांत हे तिघेही एकमेकांवर सडकून टीका करत आले आहेत. मात्र, आज तेच नेते एकत्र महाप्रसाद वाढताना दिसल्याने राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा सुरू आहे.

Akola Police : ऑनलाइन सट्टा गेमिंगचे जाळे दुबईपर्यंत!

गेल्या काही महिन्यांत गायकवाड आणि तुपकर यांच्या जवळीकतेबाबत चर्चा सुरू होती. काही दिवसांपूर्वीच दत्तपूर येथे एका भूमिपूजन कार्यक्रमातही ते दोघे एकत्र दिसले होते. त्यानंतर आता शिंदे देखील याच व्यासपीठावर गायकवाड यांच्या सोबत आल्याने हा निव्वळ योगायोग की नव्या समीकरणांची सुरुवात? असा प्रश्न उपस्थित होत आहे. भविष्यात या राजकीय तिघांमध्ये सामंजस्य वाढणार की हे केवळ एका सामाजिक कार्यक्रमापुरतेच सीमित राहणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.