Sevagram is a place of pilgrimage because of Sevagram is a place of pilgrimage because of Gandhi-Vinoba: गांधी स्मारक समितीने सांगितले नैसर्गिक चिकित्सेचे महत्त्व
Wardha सेवाग्राम आश्रम प्रतिष्ठानने दिलेल्या जागेवर दुसरे संमेलन होत आहे. लोकांमध्ये या संमेलनाबद्दल उत्साह आहे. सेवाग्राम हे गांधीजींचे पवित्र स्थान आहे. गांधी-विनोबांमुळे हे तीर्थस्थान बनले आहे, असे मत गांधी स्मारक प्राकृतिक चिकित्सा समितीचे अध्यक्ष लक्ष्मी दास यांनी मांडले.
महात्मा गांधी प्राकृतिक जीवन विद्यापीठ येथे गांधी स्मारक प्राकृतिक चिकित्सा समिती, राजघाट नवी दिल्लीद्वारा तीन दिवसांचे राष्ट्रीय प्राकृतिक चिकित्सा व योग संमेलन आयोजित करण्यात आले. या संमेलनाचे उद्घाटक म्हणून ते बोलत होते. ‘गांधी-विनोबांनी प्राकृतिक चिकित्सासाठी जी साधना आणि विचार दिला त्याला तोड नाही. त्यामुळे सर्व पॅथीमध्ये प्राकृतिक चिकित्सा पॅथी ही वेगळी आहे. ही चिकित्सा सर्व गावागावांत पोहोचावी,’ असही ते म्हणाले.
यावेळी उपाध्यक्ष नारायण भट्टाचार्य व डॉ. सुबोध भटनागर, सदस्य आदित्य पटनायक, महादेव विद्रोही, मंत्री पुनित कुमार मल्लिक, डॉ. जेकब वडकम् चेरी, डॉ. टी. एन. श्रीवास्तव, डॉ. धनंजय कुटेमाटे, डॉ. भालचंद्र नेटके, गीतांजली, राजीव देशपांडे, धनंजय धार्मिक, राजीव देशपांडे आदींची उपस्थिती होती.
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या प्रतिमा पूजनाने संमेलनाला सुरुवात झाली. सुगंधित ग्रुपने गणेश वंदना सादर केली. तीन दिवसांत नवी दिशा आणि माहिती मिळणार आहे. त्यानंतर ही चिकित्सा गावागावांत पोहोचेल हे ध्येय बाळगून सर्वांनी प्रयत्न करावेत, असे मत धनंजय धार्मिक यांनी व्यक्त केले.
प्राकृतिक चिकित्सा लोकांपर्यंत पोहोचवण्याचा संकल्प आहे. आपली दिनचर्या आहार-विहार, जल-वायू यातून आपली जीवनशैली तयार करा. प्राकृतिक चिकित्सेला भविष्य आहे. देशासाठी सेवाग्राम केंद्र बनले पाहिजे आणि महापुरुषांनी या पद्धतीचा उपयोग करून स्वतःला मजबूत केल्याचे आदित्य पटनायक यांनी सांगितले. तर महादेव विद्रोही, डॉ.धनंजय कुटेमाटे, निर्मला बहन, डॉ. जेकब चेरी यांनीही मार्गदर्शन केले. याप्रसंगी अकोला येथील योग टीमने सूर्यनमस्कार, चंद्र नमस्कार आणि पृथ्वी नमस्कारचे प्रात्यक्षिक केले