Ganesh Naik : ‘माझा पोरगा चोर आहे, असं बापाने बोलू नये’; गणेश नाईकांचा विरोधकांना जळजळीत टोला

Navi Mumbai Civic Polls : नवी मुंबईच्या अस्वच्छतेच्या आरोपांवरून नाईक आक्रमक; प्रशासकीय ढिसाळपणावर फोडले खापर

Navi Mumbai नवी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत भाजपचे नेते आणि वनमंत्री गणेश नाईक यांनी विरोधकांच्या टीकेचा अत्यंत धारदार शब्दांत समाचार घेतला आहे. “ज्यांनी गेल्या पाच वर्षांत शहराचा कारभार पाहिला, तेच आज शहराच्या अस्वच्छतेवर बोलत आहेत. किमान ‘माझा पोरगा चोर आहे’ असं बापाने तरी जगाला सांगू नये,” अशा शब्दांत नाईक यांनी विरोधकांवर पलटवार केला आहे.

नवी मुंबई वरून सुंदर आणि आतून अस्वच्छ असल्याचे आरोप करणाऱ्यांना नाईक यांनी आरसा दाखवला. “गेल्या पाच वर्षांत जर काही समस्या निर्माण झाल्या असतील, तर त्या केवळ प्रशासनाच्या कालखंडात झाल्या आहेत,” असे स्पष्ट करत त्यांनी लोकप्रतिनिधींच्या भूमिकेचे समर्थन केले. पाणीपुरवठा आणि स्वच्छतेच्या बाबतीत नवी मुंबई महानगरपालिकेला मिळालेल्या राष्ट्रीय पुरस्कारांचा दाखला देत, त्यांनी विरोधकांचे आरोप खोडून काढले.

BMC election: मोदी मोठे होण्याआधी अंबानी मोठे होते, मोदी मोठे झाल्यानंतरच अदानी मोठे झाले

गणेश नाईक यांनी सत्तेत आल्यानंतर प्रशासकीय स्वच्छतेचाही संकल्प सोडला आहे. १. चौकशीचा घेरा: गेल्या पाच वर्षांच्या काळात महापालिकेतून काढण्यात आलेल्या सर्व टेंडर्सचे सखोल ऑडिट करण्याचा निर्णय त्यांनी जाहीर केला आहे. २. अनियमिततेवर कारवाई: टेंडर प्रक्रियेत कोणताही आर्थिक गैरव्यवहार किंवा अनियमितता आढळल्यास संबंधितांवर कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशारा त्यांनी दिला.

Akola Municipal Corporation Election : विकासकामांच्या मुद्द्यावर भाजप मतदारांच्या दारात, प्रचाराचा धडाका

“दुसऱ्यावर टीका करताना आपल्याकडे किती बोटे आहेत, याचे भान विरोधकांनी ठेवावे,” असा टोला लगावत नाईक यांनी नवी मुंबईच्या विकासाचा कणा भाजपच असल्याचे अधोरेखित केले. नाईक यांच्या या ‘ऑडिट’ अस्त्रा मुळे विरोधकांच्या गोटात खळबळ उडाली असून, आगामी काळात नवी मुंबईचे राजकारण भ्रष्टाचाराच्या आरोपांवरून अधिक तापण्याची चिन्हे आहेत.