Salil Deshmukh’s demand to Forest Minister Ganesh Naik : सलील देशमुखांची वनमंत्री गणेश नाईक यांच्याकडे मागणी
Nagpur : नागपूर जिल्ह्यातील काटोल तालुक्यालगत बोर अभयारण्याचे मोठया प्रमाणात बफर झोन आहे. धोटीवाडा येथुन जंगल सफारी सुरु केली तर पर्यटनात वाढ होईल. स्थानिकांना मोठया प्रमाणात रोजगारही उपलब्ध होवू शकतो. त्यामुळे बोर अभयारण्यासाठी काटोल तालुक्यातील धोटीवाडा येथुन सफारी गेट सुरु करण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते सलील देशमुख यांनी वन मंत्री गणेश नाईक यांच्याकडे केली.
बोर अभयारण्यात वाघ, बिबट, हरिण, निलगाय, अस्वल यासह अनेक जंगली जनावरे आहेत. तसेच वन्यप्राण्यांसह अनेक पक्ष्यांचा मोठया प्रमाणात वावर आहे. धोटीवाडा व परिसरात जवळपास 9 गावांचा समावेश हा बोर अभयारण्याच्या बफर झोनमध्ये करण्यात आला आहे. जर धोटीवाडा येथुन सफारी सुरु केली तर पर्यटनात तर वाढ होईलच सोबतच स्थानींकानासुध्दा मोठया प्रमाणात रोजगार उपलब्ध होण्यास मदत होईल.
धोटीवाडा सफारी गेट सुरु झाल्यास नागपूरसह अमरावती, वर्धा तसेच मध्यप्रदेशातील पांढुर्णा व इतर भागांतील वन्यप्रेंमींना याचा फायदा होईल, असेही सलील देशमुख यांनी वन मंत्री गणेश नाईक यांना भेटीदरम्यान पटवून दिले.
नागपुर जिल्ह्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मागील दोन वर्षापासुन वन्य प्राण्यांपासुन झालेल्या नुकसानीची भरपाई मिळाली नाही. नागपूर जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात निलगाय, रोही, रानडुक्कर यांसारख्या वन्य प्राण्यांचा वावर असल्याने शेतकऱ्यांच्या शेतामधील उभ्या पिकांचे सतत नुकसान होते.
आधीच आर्थिक संकटात असलेला शेतकरी हवालदील झालेला आहे. त्याचप्रमाणे बिबट, रानडुक्कर, लांडगा या वन्य प्राणांपासुन शेतकऱ्यांचे व शेतातील मजूर, पशुधन यांचेसुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसान होत असते. त्यामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या झालेल्या नुकसानीची भरपाई शासनाकडुन तातडीने मिळण्याची अपेक्षा आहे. परंतु नागपुर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मागील दोन वर्षांपासुन नुकसान भरपाई मिळाली नाही. लवकरात लवकर नुकसान भरपाई मिळण्यासाठी सलील देशमुख यांनी मंत्री गणेश् नाईक यांच्याकडे विनंती केली.
Ashish Deshmukh : नागपूर जिल्ह्यात होणार फर्टीलायझर कॉम्प्लेक्स !
तपणी देवस्थनाला वनजमीन मिळावी..
रघवी समाजाचे तपणी येथे मोठे देवस्थान आहे. दरवर्षी येथे मोठमोठे कार्यक्रम होत असतात. परंतु जागा अपुरी असल्याने लगतच असलेली वनजमीन देवस्थानला मिळावी, यासाठी मागील काळात आम्ही सातत्याने पाठपुरावा केला. ती वनजमीन देवस्थानला लवकर मिळावी, अशी मागणी सलील देशमुख यांनी केली. यावर सकारात्मक उत्तर वन मंत्री गणेश नाईक यांनी दिल्याचे सलील देशमुख यांनी सांगितले.