Breaking

Gang rape of a minor girl : परीक्षाकेंद्रावर नव्हे थेट कारागृहात पोहोचला

Accused directly to the jail instead of examination center : आर्वी येथील सामूहिक अत्याचार प्रकरण

Wardha सोशल मीडियावर मैत्री झालेल्या मैत्रिणीला भेटण्यासाठी १२ वीचा विद्यार्थी बोर्डाचे पेपर सोडून गेला होता. एका नातलगाची भेट झाली. दरम्यान येथे आणखी चार युवक पोहोचले. मुलीवर सामूहिक अत्याचार केला. त्यामुळे बोर्डाच्या परीक्षा केंद्राऐवजी मुलाची कारागृहात रवानगी झाली.

आर्वी तालुक्यात एका गावात १० रोजी रात्री ७ ते ८:३० वाजताच्या सुमारास पाच जणांनी अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली. या घटनेने परिसरात नव्हे, तर जिल्ह्यातच खळबळ उडाली. पोलिस अधीक्षकांनी आर्वी गाठून माहिती घेतली. पीडित मुलीने आई सोबत जाऊन तक्रार दाखल केली असता, पाच नावे समोर आली. त्यातील एक आरोपी अमरावतीतील अल्पवयीन आहे. तो १२ व्या वर्गाचा विद्यार्थी असल्याचे पुढे आले आहे.

Dr. Pankaj Bhoyar : वर्धेतील आयुष रुग्णालयाच्या निधीला Green Signal!

अल्पवयीन मुलाची आणि आर्वीतील पीडित अल्पवयीन मुलीची सोशल मीडिया इंस्टाग्रामवर मैत्री झाली होती. अल्पवयीन मुलगा मामाकडे राहून परीक्षेची तयारी करत होता. परीक्षेच्या आदल्या दिवशी मुलीला भेटण्यासाठी तालुक्यातील एका गावात दाखल झाला. नातेवाइकांकडे कुणी नसल्याने तेथे भेटायचे ठरले. मात्र, आधीच घात लावून असलेल्या चार जणांनी या ठिकाणी येत अत्याचार केला.

घटनेनंतर मुलीला सोडून देत अमरावतीला जाताना या अल्पवयीन मुलास पोलिसांनी ताब्यात घेतले. तर, दोन आरोपी हिंगणघाट व दोन आरोपींना अमरावती येथून ताब्यात घेतल्याचे पोलिसांनी सांगितले. या चार आरोपींपैकी दोन आरोपी नोकरीवर, तर दोन व्यवसाय करीत असल्याचे सांगण्यात आले.

CJI Sanjeev Khanna : कठोर परिश्रमाशिवाय पर्याय नाही!

आरोपींना न्यायालयात सादर केले असता, १४ पर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली होती. दरम्यान १४ रोजी शुक्रवारी घटनाक्रम समजून घेण्यासाठी गुन्हेगारांना घटनास्थळी घेऊन जात असताना, पोलिसांचे वाहन बंद पडले. यावेळी आरोपींना बेड्या घातलेल्या स्थितीत घठनास्थळी पायदळ घेऊन गेले. दरम्यान बघ्यांची बरीच गर्दी झाली होती. यावेळी पोलिसांनी आरोपीची धिंड काढल्याच्या चर्चेला उधाण आले.