Gauri Palve : पंकजा मुंडे यांचे पीए अनंत गर्जे यांच्या पत्नीचा संशयास्पद मृत्यू

Family alleges murder instead of suicide : आत्महत्येऐवजी हत्या असल्याचा कुटुंबीयांचा आरोप

Mumbai : मंत्री पंकजा मुंडे यांचे पीए अनंत गर्जे यांच्या पत्नी डॉ. गौरी पालवे टोकाचे पाऊल उचलत आत्महत्या केल्याची घटना समोर आली असून या प्रकरणाने राज्यात मोठी खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती मिळताच पंकजा मुंडे यांनी तात्काळ सर्व दौरे रद्द करत परिस्थितीची माहिती घेतली. मृत महिलेच्या कुटुंबीयांनी मुंबईतील वरळी पोलिस ठाण्यात धाव घेऊन हा मृत्यू आत्महत्या नसून हत्या असल्याचा गंभीर आरोप केला आहे. अगदी काही महिन्यांपूर्वीच अनंत गर्जेचे लग्न मोठ्या थाटामाटात पार पडले होते, मात्र काही दिवसांपासून पती–पत्नीमध्ये गंभीर वाद सुरु असल्याचे कुटुंबीयांनी सांगितले.

मृत महिलेच्या मामांनी माध्यमांना दिलेल्या माहितीनुसार, अनंत गर्जे आणि त्याच्या पत्नीत सातत्याने भांडणे होत होती. अनंत गर्जेचे बाहेर संबंध असल्याचे महिलेच्या हाताला आले आणि यावरून दोघांत तणाव वाढला. महिलेने याबाबत सर्व माहिती आपल्या वडिलांना दिली होती आणि अनंतला हे संबंध तोडण्यास तसेच पुन्हा असे न करण्यास स्पष्ट सांगितले होते. तरीही तो सतत चॅटिंग करत असल्याचे कुटुंबीयांनी सांगितले. मुलीने आपल्या वडिलांना काही चॅटचे स्क्रीनशॉटही पाठवले होते. घटनेच्या दिवशी दोघांमध्ये मोठा वाद झाला होता. वादादरम्यानच तिने वडिलांना फोन केला होता, अशी माहिती कुटुंबीयांनी दिली.

Nitin Gadkari : प्रगतीच्या साधनांसोबत समृद्ध विचारसरणीही तेवढीच आवश्यक !

कुटुंबीयांच्या म्हणण्यानुसार, ज्या वेळी मृत महिला आत्महत्या करत होती त्या वेळी अनंत गर्जे घरातच होता. त्यानेच तिला दवाखान्यात नेले आणि काही वेळ तिथे थांबून नंतर निघून गेला. ‘‘हा मृत्यू आत्महत्या नसून हत्या असल्याचा आमचा ठाम दावा आहे. आमच्या मुलीला न्याय मिळालाच पाहिजे,’’ अशी मागणी कुटुंबीयांनी केली. ते पुढे म्हणाले की, अद्याप या प्रकरणी गुन्हा दाखल झालेला नाही आणि आमची बहीण मुलीच्या निधनाने कोसळली आहे. बीडहून मुंबईत पोहोचलेल्या कुटुंबीयांनी तपासातील विलंबावरही नाराजी व्यक्त केली आहे. वरळी पोलिस तपास करत असले तरी कुटुंबीयांचा आरोप आणि मृत्यूदरम्यानची संशयास्पद परिस्थिती पाहता हा प्रकार अधिकच गूढ बनत चालला आहे.

————————–