Earning a whopping $5.74 billion in a single day : एका दिवसात तब्बल 5.74 अब्ज डॉलर्सची कमाई
Mumbai : शेअर बाजारातील तेजीचा सर्वाधिक लाभ उद्योगपती गौतम अदानी यांना झाला असून, त्यांनी केवळ एका दिवसात तब्बल 5.74 अब्ज डॉलर्स सुमारे 5,03,01,91,88,700 रुपये कमावले आहेत. या झपाट्याने झालेल्या संपत्तीवाढीनंतर अदानी यांची एकूण संपत्ती 79.7 अब्ज डॉलर्सवर पोहोचली आहे आणि ते पुन्हा ब्लूमबर्ग अब्जाधीश निर्देशांकातील टॉप 20 श्रीमंतांच्या यादीत परतले आहेत.
८ ऑगस्ट रोजी सलग सहा आठवड्यांच्या घसरणीनंतर बाजाराने जोरदार उसळी घेतली. सेन्सेक्स 746.29 अंकांच्या वाढीसह 80,604.08 अंकांवर बंद झाला, तर निफ्टी 221.75 अंकांनी वाढून 24,585.05 अंकांवर स्थिरावला. या वाढीचा थेट परिणाम अब्जाधिशांच्या संपत्तीवर दिसून आला. अदानींसह अन्य भारतीय श्रीमंतांच्याही संपत्तीत भर पडली आहे. मुकेश अंबानी हे यादीत १८व्या क्रमांकावर असून, त्यांनी एका दिवसात 1.40 अब्ज डॉलर्सची कमाई केली आहे. सध्या त्यांची एकूण संपत्ती 99.5 अब्ज डॉलर्स आहे.
Administration : प्रशासकीय रचना, कामकाजाच्या प्राधान्यक्रमात बदल !
कमाईच्या बाबतीत अदानींपेक्षा फक्त एलोन मस्क पुढे आहेत. मस्क यांच्या संपत्तीत एका दिवसात 6.69 अब्ज डॉलर्सची वाढ झाली असून, ते जगातील सर्वाधिक श्रीमंत व्यक्तींच्या यादीत पहिल्या क्रमांकावर आहेत. दुसऱ्या क्रमांकावर लॅरी एलिसन असून, त्यांच्या संपत्तीत 3.30 अब्ज डॉलर्सची वाढ होऊन ती 305 अब्ज डॉलर्सवर पोहोचली आहे. फेसबुकचे सीईओ मार्क झुकरबर्ग यांची एकूण संपत्ती 269 अब्ज डॉलर्स असली तरी, त्यांना या काळात 1.15 अब्ज डॉलर्सचे नुकसान सोसावे लागले आहे.
ब्लूमबर्गच्या यादीत अदानी आणि अंबानींसह इतरही अनेक भारतीय उद्योगपती आहेत. एचसीएल संस्थापक शिव नाडर
$35.3 अब्ज संपत्ती, ५६वा क्रमांक शापूर मिस्त्री $32.3 अब्ज संपत्ती, ६४वा क्रमांक, सावित्री जिंदाल $31.5 अब्ज संपत्ती, ६५वा क्रमांक याशिवाय सुनील मित्तल, अझीम प्रेमजी, लक्ष्मी मित्तल, दिलीप संघवी, कुमार बिर्ला, राधाकिशन दमानी यांसारख्या दिग्गज उद्योगपतींचा देखील या यादीत समावेश आहे.
Chandrashekhar Bawankule : पालकमंत्र्यांच्या ‘किचन ३६५’ भेटीवर युवक काँग्रेसचा संताप!
शेअर बाजारातील या तेजीने भारतीय अब्जाधीशांच्या संपत्तीत मोठी उंच भरारी घेतली असून, येत्या दिवसांत बाजाराचा कल कायम राहिल्यास ही वाढ आणखी गती घेऊ शकते असे तज्ञांचे मत आहे.








