Mahayuti government’s mentality comes under fire : बाबासाहेबांचे नाव टाळल्याचा आरोप; महायुती सरकारच्या मानसिकतेवर टीका
Shegao नाशिक येथील ध्वजारोहण कार्यक्रमात राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा नामोल्लेख जाणीवपूर्वक टाळल्याचा आरोप करीत वंचित बहुजन आघाडीच्या वतीने २७ जानेवारी रोजी शेगाव तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत मंत्रिपद रद्द करण्याची मागणी केली.
ध्वजारोहण कार्यक्रमादरम्यान बाबासाहेबांचे नाव न घेतल्याबाबत तेथे उपस्थित वनरक्षक माधवी जाधव यांनी आक्षेप नोंदविला होता. संविधान आणि डॉ. आंबेडकरांचे नाव पुसून टाकण्याचा हा प्रयत्न असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली होती. यासंदर्भातील व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाल्यानंतर राज्यभरात संताप व्यक्त करण्यात येत आहे.
Amravati Municipal Corporation : अमरावती महापौर निवडणूक आठवडाभर लांबली; गट नोंदणीला दिलासा
या प्रकरणात वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी आक्रमक भूमिका घेतली असून, त्यांच्या आदेशानुसार शेगावात हे आंदोलन करण्यात आले. “महापुरुषांचा अपमान करणाऱ्या मंत्र्याला मंत्रिमंडळात राहण्याचा नैतिक अधिकार नाही,” अशी स्पष्ट भूमिका आंदोलकांनी मांडली.
आंदोलनात तालुकाध्यक्ष प्रवीण विरघट यांनी सरकारवर जोरदार टीका केली. ते म्हणाले, “प्रजासत्ताक दिन म्हणजे संविधानाचा उत्सव. अशा दिवशी संविधानाच्या शिल्पकाराचे नाव न घेणे ही बाब महायुती सरकारची मानसिकता उघड करणारी आहे. माधवी जाधव यांनी दाखवलेले धाडस कौतुकास्पद असून वंचित बहुजन आघाडी त्यांच्या पाठीशी ठामपणे उभी आहे.”
Ajit Pawar : शेअर्समध्ये मोठी गुंतवणूक, आलिशान गाड्यांची आवड !
या आंदोलनात सुधाकर इंगळे, किशोर शेगोकार, डी. एन. खंडारे, सुभाष गोधडे, श्रीकृष्ण गवई, दादाराव अंभोरे, कैलास दाभाडे, संतोष डोंगरे, शैलेश भारसाकडे, राजकिरण सावदेकर, सुभाष तायडे, संतोष गव्हांदे, जानराव वानखडे, कैलास पहुरकर, राजेंद्र विरघट, सुरेश वाघ, पंडित परघरमोर, मुकेश शेगोकार, डॉ. सुनील गव्हांदे, प्रमोद गव्हांदे, पुष्पाताई गव्हांदे यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते सहभागी झाले होते.








