War between Iran, Israel; Gold prices increased : मोठ्या युद्धाला तोंड फुटले, शेअरसह इतर व्यापारावर थेट परिणाम
Mumbai: इस्त्रायलने इराणवर बॉम्ब वर्षाव करत अजून एका मोठ्या युद्धाला तोंड फोडले आहे. यामुळे युद्ध भडकले आहे. त्याचा थेट परिणाम शेअर सह इतर व्यापारावर दिसून येत आहे.
सुरक्षित गुंतवणूक म्हणून पाहिल्या जाणाऱ्या सोन्या च्या व्यापारावरही या घटनेचा मोठा परिणाम झाला असून, सोन्याचे दर पुन्हा वाढत आहेत. सोन्याच्या दराने आता एक लाखाचा टप्पा गाठला आहे.
इस्त्रायल आणि इराण या दोन देशात युद्ध भडकले आहे. त्यामुळे अशांतता वाढली आहे. दोन्ही देश एकमेका विरुद्ध लढत आहेत. क्षेपणास्त्रांचा मुक्त वापर होत आहे. या घडामोडीचा शेअर बाजारासह इतर व्यापारावर थेट परिणाम दिसून येत आहे. सोन्याच्या किंमतींना भडकल्या असून आकाशाला भिडल्या आहेत. वायदे बाजारात सोन्याचा भावाने लाखांचा टप्पा ओलांडला आहे. स्थानिक सोने पेढ्यांवर, सराफा बाजारात जोरदार वाढ दिसून आली आहे.
Accident at a tourist spot : मनालीमध्ये झिप लाइन अपघातात नागपूरची त्रिशा गंभीर जखमी
मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर म्हणजे एम्सीएक्स वर 10 ग्रॅम सोन्याचा भाव पुन्हा 1 लाख रुपयांवर आला आणि त्यात आणखी घोडदौड सुरूच आहे. या आठवड्यात सोन्याने चांगली उडी घेतली. चांदीच्या दरा सोबत सोन्याने स्पर्धा लावली. 6 जून रोजी वायदे बाजारात पुढच्या सौद्यासाठी सोन्याचा भाव 97,036 रुपये प्रति 10 ग्रॅम होता. तर 13 जून रोजी हा भाव 1 लाख 681 रुपये प्रति10 ग्रॅम असा झाला. सोने त्याच्या सर्वकालीन उच्चाकांवर पोहचले. म्हणजे एका आठवड्यात 10 ग्रॅम सोने 3,645 रुपयांनी महागले.
Student passes : आता एसटीच्या पासेससाठी होणार नाही विद्यार्थ्यांची पायपीट !
देशातील विविध सराफा बाजारात सोन्याची चमक वाढल्याचे पाहायला मिळत आहे सोन्याच्या भावात वाढ झाली. इंडियन बुलियन ज्वेलर्स असोसिएशननुसार, 6 जून रोजी 24 कॅरेट सोन्याचा भाव 98,163 रुपये प्रति 10 ग्रॅमवर होते. तर शुक्रवारी 13 जून रोजी 24 कॅरेट सोन्याचा भाव 99,060 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहचले होते. एका आठवड्यात स्थानिक बाजारपेठेत 10 ग्रॅम सोन्याच्या किंमतीत 897 रुपयांची वाढ झाली. सोने एका आठवड्यात चमकले. जळगाव सराफा बाजारात चांदी पाठोपाठ सोन्याने मोठी झेप घेतली. गेल्या आठवड्यात चांदीने मोठी उडी घेतली होती. त्यानंतर सोन्याने पण मोठी कामगिरी केली.