Thieves from Nagpur stole 15 electric poles in Gondia : नागपूरच्या चोरांचा गोंदियात कारनामा, गॅस कटरचा वापर
Gondia चोरांच्या हिंमतीचेही कधीकधी कौतुक करावे, अशा घटना घडतात. गोंदियातील एका ठिकाणी पथदिव्यांसाठी १६ विजेचे खांब लावण्यात आले होते. नागपुरातून गेलेल्या चोरांनी १६ पैकी १५ खांब गॅस कटरने कापले आणि चोरी केले. हे तिन्ही चोर नागपूरचे आहेत आणि बहुधा एकाच कुटुंबातील आहेत, असे कळते.
वीज वितरणासाठी लावण्यात आलेले वीज खांब चोरून नेणाऱ्या टोळीला जेरबंद करण्यात पोलिसांना यश आले. स्थानिक गुन्हे शाखेने या प्रकरणात तीन आरोपींना नागपूर येथून अटक केली. त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात चोरीचा मालही जप्त करण्यात आला. मुंबई येथील पॉलीकॅप इंडिया लिमिटेड या कंपनीकडून कंत्राटी पद्धतीने बिर्सी (नायरा पेट्रोल पंप जवळ) ते मेंढा रस्त्याच्या बाजूला १६ वीज खांब ६ नोव्हेंबर २०२४ रोजी उभारण्यात आले होते. त्यानंतर तक्रारदार प्रतापसिंह ठाकूर यांचे पर्यवेक्षक अमरकंठ झेलकर (रा. रोहा, जिल्हा भंडारा) यांनी ७ व ८ जानेवारी २०२५ रोजी सायंकाळी कामाची पाहणी केली.
The Prohibition of Child Marriage Act (PCMA) : मांडव पडला, पण अक्षता पडण्यापूर्वीच बालविवाह रोखला!
त्यावेळी लावून ठेवलेल्या १६ लोखंडी वीज खांबांपैकी एक लाख २५ हजार रुपये किमतीचे १५ खांब गायब होते. हे खांब गॅस कटरने कापून नेल्याचे दिसत होते. या प्रकरणी ठाकूर यांच्या तक्रारीवरून तिरोडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यातच तिरोडा हद्दीत अशाच प्रकारे आणखी वीज खांब चोरीला गेल्याने परत गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणांचा समांतर तपास स्थानिक गुन्हे शाखेने केला होता.
गोपनीय माहिती व सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने बसंतलाल चुनबाद साहू, आशिष देवीदयाल साहू व सुंदरलाल गुड्डु साहू तिघांनाही नागपूर येथून ताब्यात घेण्यात आले. पथकाने आरोपींच्या ताब्यातून चोरी केलेल्या वीज खांबांचे ४३ लहान-मोठ्या आकाराचे तुकडे जप्त केले. या तुकड्यांची किंमत एक लाख ९२ हजार ७१५ रुपये आहे.
Sudhir Mungantiwar : केवळ भाषणांनी महिलांचे प्रश्न सुटणार नाहीत !
इंडेन कंपनीचे गॅस सिलिंडर, लोखंडी ऑक्सिजन सिलिंडर, गॅस कटर पाइप, टाटा कंपनीचा जुना ट्रक, एक मोबाईल हँडसेट असा एकूण १४ लाख २० हजार ७५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. आरोपींना तिरोडा पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे.