Breaking

Praful Patel in Gondia : पवार कुटुंब एकत्रं आलं तर आनंदच !

gondia If the Pawar family comes together, it will be happiness : बीड प्रकरणातील आरोपांवरून वडेट्टीवारांना टोमणा

Gondia उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या आई आशाताई पवार यांनी पवार कुटुंब एकत्र यायला पाहिजे असं साकडं पांडुरंगाकडे घातलं होतं. यावरून पवार कुटुंब एकत्र यावं, अशी प्रार्थना त्यांनी विठुरायाला केली असेल, असे म्हटले जाऊ लागले. यासंदर्भात गुरुवारी (दि. 2 जानेवारी) राष्ट्रवादी नेते खासदार प्रफुल पटेल यांनी पत्रकार परिषदेत महत्त्वाचं विधान केलं. पवार कुटुंब एकत्र आलं तर त्याचा मला आनंदच होईल, असं त्यांनी म्हटलं आहे. पण सध्या त्या अनुषंगाने कुठलीच चर्चा अथवा घडामोडी घडलेल्या नाहीत, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी वाल्मीक कराड यांच्या सेवेसाठी पाच पलंग पोलिस स्टेशनमध्ये नेण्यात आल्याचा आरोप केला होता. ‘कदाचित विजय वडेट्टीवार त्या ठिकाणी जाऊन आले असतील त्यामुळे त्यांना अधिक माहिती आहे. ते काय बोलले हे मला माहिती नाही. परंतु वाल्मिक कराड असो अथवा अन्य कुणीही असो, दोषीला कडक शिक्षा व्हावी, अशी आमच्या पक्षाची भूमिका आहे,’ असं पटेल म्हणाले.

बीड प्रकरणाचा तपास योग्य दिशेने सुरु आहे. याप्रकरणाची चौकशी करण्यासाठी एसआयटी सुध्दा गठीत करण्यात आली आहे. त्यामुळे या प्रकरणातील जे दोषी असतील त्यांच्यावर निश्चितच कठोर कारवाई होईल, असंही ते म्हणाले.

Akola Zilla Parishad : जिल्हा परिषद पदाधिकाऱ्यांना मिळेल मुदतवाढ ?

भुजबळ आमचेच

छगन भुजबळ मंत्रिमंडळाच्या विस्तारानंतर नाराज होऊन परदेशवारीवर निघाले होते. त्यानंतर ते आता मतदारसंघात परतले आहेत. पण अजुनही ते नाराज आहेत. त्यांच्या संदर्भात प्रफुल पटेल यांनी भूमिका स्पष्ट केली. ‘छगन भुजबळ आमच्या पक्षाचे ज्येष्ठ नेते आहेत. ते नाराज आहेत असं समजू नका. त्यांच्या ज्या काही सूचना असतील त्यावर आम्ही मार्ग काढू,’ असं ते म्हणाले.

महायुती एकत्र लढणार

स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका महायुती एकत्र लढणार असल्याचंही प्रफुल्ल पटेल म्हणाले. लवकरच राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका होण्याची शक्यता आहेत. लोकसभा, विधानसभा निवडणुकीप्रमाणेच महायुतीने एकत्र लढाव्यात असा सूर आहे. पण यावर अद्याप कुठलीच चर्चा झालेली नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं.