Gondia Market Division : थकबाकीदार दुकानदारांवर कारवाई; दुकानाला ठोकले सील!

Action against shopkeepers with outstanding debts : गोंदिया बाजार विभागाची धडक कारवाई; वसुली मोहीम जोरात

Gondia मार्च अखेरचा कालावधी सुरू झाल्याने नगर परिषद बाजार विभागाने कर वसुली मोहीम गतीमान केली आहे. याअंतर्गत थकबाकीदार दुकानदारांवर कारवाई सुरू करण्यात आली आहे. सोमवारी (३१ मार्च) मुख्य बाजारातील नाई लाइनमध्ये एका दुकानदाराचे दुकान सील करण्यात आले.

नगर परिषदेसाठी मालमत्ता कर आणि बाजार कर हे प्रमुख उत्पन्नाचे स्रोत आहेत. वर्षभर थकबाकीदारांकडून कर भरण्यास टाळाटाळ केली जाते. मात्र, आर्थिक वर्षाच्या शेवटी मार्च महिन्यात नगर परिषद प्रशासन वसुलीसाठी कठोर पावले उचलते. यंदाही बाजार विभागाने थकबाकीदारांची गय न करता थेट दुकान सील करण्याचा निर्णय घेतला आहे.

Gondia Bank : जिल्हा मध्यवर्ती बँकेचा सुलतानी कारभार!

सोमवारी बाजार निरीक्षक मुकेश मिश्रा यांच्या नेतृत्वाखालील पथकाने नाई लाइनमधील संजय खटवानी यांच्या दुकानाची तपासणी केली. त्यांच्याकडे मागील दोन वर्षांची थकबाकी व चालू वर्षातील कराची मागणी होती. त्यांच्यावर ६,१०५ रुपये भाडे, १,०९८ रुपये जीएसटी आणि १,०१० रुपये व्याज असा एकूण ८,२१३ रुपयांचा कर थकित होता. मात्र, संबंधित दुकानदाराने कर भरण्यास नकार दिल्याने पथकाने दुकान सील करण्याची कारवाई केली.

Gondia Police : फेसबुक आयडी डिलीट कर, नाहीतर ठार मारू!

या कारवाईमुळे इतर थकबाकीदारांमध्ये खळबळ उडाली आहे. बाजार विभागाने यंदा केलेली ही पहिलीच मोठी कारवाई असून, येत्या काळात कर न भरणाऱ्या इतर दुकानदारांवरही कठोर पावले उचलली जाणार आहेत. नगर परिषद प्रशासनाने दुकानदारांना कर वेळेवर भरण्याचे आवाहन केले आहे. अन्यथा दुकान सील करण्याची कारवाई करण्यात येईल, असा इशारा दिला आहे.