Breaking

Gondia Police : पॅट्रोलिंग करताना सापडला सुगंधीत तंबाखू

Flavored tobacco found while patrolling : पोलिसांची दमदार कारवाई; वाहन चालक ताब्यात

Gondia पॅट्रोलिंगवर असलेल्या पोलिसांनी वाहन तपासले. वाहनात काय असेल याचा पोलिसांनाही अंदाज नव्हता. अखेर झाडाझडती घेतल्यानंतर सहा लाखांचा सुगंधीत तंबाखू गाडीमध्ये आढळला. रामनगर पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक अमोल वाघमोडे रात्री पथकासह पॅट्रोलिंग करीत होते. सुगंधित तंबाखू घेऊन चारचाकी वाहन बालाघाटकडून गोंदियाकडे येत असल्याची गुप्त माहिती मिळाली. माहितीच्या आधारावर पोलिस पथकाने येथील बालाघाट टी-पॉईंटवर कारवाई केली.

बालाघाटकडून गोंदियाकडे चारचाकी वाहनातून आणला जात असलेला सव्वा सहा लाखांचा सुगंधित तंबाखू वाहनासह जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई रामनगर पोलिसांच्या डी.बी. पथकाने बालाघाट टी-पॉईंटवर केली. पोलिसांनी वाहन चालकाला ताब्यात घेतले आहे. बालाघाटकडून येणाऱ्या वाहनांची तपासणी केली. तपासणी केली असता, पथकाला या वाहनात सुगंधित तंबाखूच्या जवळपास दहा पिशव्या आढळल्या.

Divisional Commissioner of Nagpur : वाळूघाटासह गौणखनिज उत्खननावर आता ड्रोनद्वारे वॉच

वाहन चालक बालाजी लक्ष्मीनारायण नायडू (रा. छोटा गोंदिया) याची अधिक चाैकशी केली. त्यात सव्वा सहा लाखांचा हा तंबाखू गोंदियाला आणला जात असल्याचे पुढे आले. पोलिसांनी वाहन चालकाला ताब्यात घेतले असून, सुगंधित तंबाखूसह वाहन जप्त केले आहे.

पोलिसांनी ही कारवाई केल्यानंतर अन्न औषध प्रशासन विभागाच्यावतीने जोपर्यंत अधिकृत कारवाईची प्रकिया होत नाही,तोपर्यंत गुन्हा दाखल होत नाही. त्यामुळे अन्न औषध प्रशासन विभागाने काय कारवाई केली हे कळू शकले नाही.

Chandrashekhar Bawankule : बावनकुळे म्हणतात, २६ जानेवारीपूर्वी मिळतील पालकमंत्री!

ही कारवाई जिल्हा पोलिस अधीक्षक गोरख भामरे, अपर पोलिस अधीक्षक झा, उपविभागीय पोलिस अधिकारी रोहिणी बानकर, रामनगरचे पोलिस निरीक्षक बोरकुटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक अमोल वाघमोडे, सहायक फाैजदार भुरे, पोलिस हवालदार चव्हाण, पोलिस हवालदार भगत, पोलिस शिपाई नागपुरे, कांबळे, फेंडर यांनी केली.