Breaking

Gondia Police : दिड लाखांचा गांजा बेवारस पडून होता!

Police found 8 kg Ganja in Gandhidham Express : गांधीधाम एक्स्प्रेसच्या जनरल डब्यातील प्रकार

Gondia रेल्वे गाडीच्या जनरल डब्यात बेवारस स्थितीत पडून असलेल्या बॅगमधून रेल्वे पोलिसांनी ८.२२४ किलो गांजा जप्त केला. जप्त करण्यात आलेल्या गांजाची किंमत एक लाख ६४ हजार ४८० रुपये सांगितली जात आहे.

रेल्वे पोलिस उपनिरीक्षक टेंभुर्णीकर आपल्या सहकाऱ्यांसोबत मादक पदार्थांच्या तस्करीला आळा घालण्यासाठी ‘ऑपरेशन नार्कोस’ राबवित आहे. यांतर्गत ते दुर्ग ते गोंदियादरम्यान गांधीधाम साप्ताहिक एक्स्प्रेसमध्ये (१२९९४) मध्ये तपासणी करीत होते. गाडी दरेकसा स्थानकावरून निघाल्यानंतर इंजिनपासून पाचवा सामान्य डबा क्रमांक डब्ल्यूआर-२४७४४३ मध्ये तपासणी करीत होते.

Swati Industries case : स्वाती इंडस्ट्रीजकडून रेकॉर्ड गायब?; करदात्यांना हेलपाटे!

त्यावेळी त्यांना निळ्या रंगाची बॅग बेवारस स्थितीत आढळली. पथकाने डब्यात बसलेल्या प्रवाशांना बॅगबाबत विचारणा केली. पण, कुणीही काहीच सांगू शकले नाही. त्यानंतर पथकाने बॅग उघडून बघितली. त्यावेळी त्यात गांजा भरलेले चार पाकीट दिसले. गाडी गोंदिया येथील रेल्वे स्थानकावरील फलाट क्रमांक तीनवर आल्यानंतर पथकाने बॅग ताब्यात घेतली.

पथकाने गोंदिया स्थानकावर गाडी येताच गांजाचे पाकीट असलेली बॅग ताब्यात घेतली. तसेच नायब तहसीलदार नितील शिवचरण चवरे यांच्या समक्ष कारवाई केली. त्यानंतर बॅग व गांजाचे पाकीट पुढील कारवाईसाठी रेल्वे पोलिसांच्या सुपूर्द करण्यात आले. पोलिसांनी कलम ८ (सी), २० (बी) (२) एनडीपीएस अधिनियम अंतर्गत गुन्हा नोंद केला आहे. जप्त करण्यात आलेल्या गांजाचे वजन ८.२२४ किलोग्रॅम आहे. त्याची किंमत एक लाख ६४ हजार ४८० रुपये सांगितली जात आहे.

BJP Meeting : अकोल्यात आज भाजप मंत्र्यांची मांदियाळी

कुणाचे पार्सल होते?
दीड लाखांहून अधिक किंमतीचा गांजा बेवारस सोडून कोण निघून गेला? पोलिसांचा राऊंड होतो, याची त्याला माहिती होती का? आणि हा गांजा नेमका कोणी कोणासाठी पाठवला होता? असे अनेक प्रश्न या निमित्ताने उपस्थित झाले आहेत. मादक पदार्थांची तस्करी रेल्वेच्या माध्यमातून होणे नवे नाही. पण बेवारस बॅगमुळे पोलिसांना कुणीतरी भुरट्या चोर असावा, अशीही शंका येत आहे. असे नसेल तर पार्सल नेमके कुणाचे होते, असा प्रश्न कायम राहतो.