Breaking

Gondia Zilla Parishad : अध्यक्षाचे नाव नागपुरातून बंद लिफाफ्यात येणार !

Election of Zilla Parishad President can be held on January 23 : भाजपची तयारी जोरात; कुणाची वर्णी लागणार?

Gondia जिल्हा परिषद अध्यक्षांसह विषय समिती सभापतींचा अडीच वर्षांचा कार्यकाळ नोव्हेंबर महिन्यात पूर्ण झाला. या कालावधीत विधानसभेच्या निवडणुका असल्याने अध्यक्ष व सभापतींचा निवडणूक कार्यक्रम पुढे ढकलण्यात आला होता. आता जिल्हा प्रशासनाने निवडणुकीच्या प्रक्रियेला सुरुवात केली आहे. १० जानेवारीला पंचायत समिती सभापतिपदासाठी आरक्षण सोडत काढण्यात येणार आहे. तर २३ जानेवारीला जिल्हा परिषद अध्यक्ष व विषयी समिती सभापतींची निवडणूक होणार असल्याची माहिती आहे.

जिल्हा परिषदेला जिल्ह्याचे मिनी मंत्रालय म्हटले जाते. येथून ग्रामीण भागाच्या विकासासाठी अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले जातात. तर जि. प. अध्यक्षपद हे पुढील राजकीय भविष्याची नांदी समजली जाते. येथूनच पुढे अनेक जण आमदार व खासदार झाल्याची उदाहरणे आहेत.
एकूण ५३ सदस्यीय गोंदिया जि. प. मध्ये भाजपचे २८, चावी संघटनेचे ५, राष्ट्रवादी काँग्रेसचे १०, काँग्रेसचे ११ आणि अपक्ष १, असे पक्षीय बलाबल आहे. अडीच वर्षांसाठी भाजपचा अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेसचा उपाध्यक्ष व दोन-दोन एक, असे विषय समिती सभापतिपदाचे सूत्र ठरले होते. याच सूत्रानुसार आता पुढील अडीच वर्षांसाठी अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि सभापतींची निवड केली जाणार आहे.

Ajit Pawar Eknath Shinde : राष्ट्रवादीच्या टार्गेटवर एकनाथ शिंदेंचा विभाग !

वरीष्ठ घेतील निर्णय
जिल्हा परिषद अध्यक्षपदी कुणाची वर्णी लावायची, याचा अंतिम निर्णय हा नागपुरातील भाजपचे वरिष्ठ नेते घेणार आहे. निवडणुकीच्या दिवशी नागपूरवरून एका लिफाफ्यात अध्यक्षाचे नाव येणार असल्याची माहिती भाजपच्या एका पदाधिकाऱ्याने दिली.

खुर्ची सोडायला तयार नाही

अध्यक्षपदाची निवडणूक २३ जानेवारीला होण्याची शक्यता आहे. त्यासाठी आता घडामोडींना वेग आला आहे. तर भाजपकडून अध्यक्षपदी कुणाची वर्णी लागणार, यासाठी आता राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. तर सध्या पदारूढ असल्याने दोन पदाधिकाऱ्यांची अद्यापही खुर्ची सोडण्याची इच्छा नाही. त्यांनी आपल्यालाच पदावर कायम ठेवण्यात यावे. यासाठी जोरदार फिल्डिंग लावली असल्याची माहिती आहे. त्यामुळे त्यांची ही फिल्डिंग कितपत कामी येते, हे २३ जानेवारीलाच कळणार आहे.