Breaking

Gondia Zilla Parishad : जिल्हा परिषदेत इच्छुक अनेक, पण संधी कुणाला?

Vishay Samiti Chairman Election on February 10 : विषय समिती सभापती निवडणूक १० फेब्रुवारीला

Gondia जिल्हा परिषद अध्यक्ष व उपाध्यक्षपदाची निवडणूक २४ जानेवारीला पार पडली. त्यानंतर आता विषय समिती सभापतिपदासाठी १० फेब्रुवारी रोजी निवडणूक होणार आहे. सभापतिपद चार आणि इच्छुक ४० वर असल्याने सभापतिपदी वर्णी लागण्यासाठी जि. प. सदस्यांमध्ये चढाओढ सुरू झाली आहे.

जि. प.मध्ये भाजप व राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाची सत्ता आहे. तर नुकत्याच पार पडलेल्या अध्यक्ष व उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत हेच सूत्र कायम ठेवण्यात आले. विषय समिती सभापतिपदाच्या निवडणुकीतही याच समीकरणाने निवड केली जाणार आहे. महिला बालकल्याण, समाजकल्याण, बांधकाम, कृषी व पशुसंवर्धन आणि शिक्षण व आरोग्य अशी एकूण पाच विषय समिती सभापतिपदे आहेत.

Collector of Buldhana : ड्रोनच्या वापरामुळे शेतकऱ्यांची चिंता मिटेल

यापैकी शिक्षण व आरोग्य आणि समाजकल्याण सभापतिपद राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या वाट्याला जाणार आहे. तर महिला बालकल्याण, बांधकाम, कृषी व पशुसंवर्धन ही तीन पदे भाजपच्या वाट्याला जाणार आहेत. जिल्हा परिषदेत भाजपचे ३१ सदस्य आहेत. त्यातच बांधकाम सभापतिपद सर्वांत महत्त्वपूर्ण मानले जाते.

त्यामुळे या पदाला घेऊन भाजपच्या सदस्यांमध्ये चुरस पाहायला मिळत आहे. भाजपचे वरिष्ठ नेते आणि जि. प.चे अध्यक्ष लायकराम भेंडारकर यांच्यात विचारविनिमय होऊन सभापतिपदी सदस्यांची वर्णी लावली जाणार आहे. १० फेब्रुवारीला विषयी समिती सभापतिपदासाठी निवडणूक होणार आहे. त्यामुळे यात नेमकी कुणाची वर्णी लागते याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

जिल्हा परिषद अध्यक्ष व उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीदरम्यान भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी दोन सदस्यांना सभापतिपदी वर्णी लावण्याचे आश्वासन दिल्याची माहिती आहे. तिरोडा, गोरेगाव व गोंदिया तालुक्याला प्रत्येकी एक सभापतिपद जाणार असल्याची चर्चा जि.प.च्या वर्तुळात आहेत.

Ex-MLA Rahul Bondre : लोकशाही मूल्यांसाठी संघर्ष सुरूच राहणार

जिल्हा नियोजन समितीची निवडणूक १२ फेब्रुवारीला होणार आहे. यात जि.प.च्या एकूण ५३ सदस्यांपैकी १४ सदस्यांची जिल्हा नियोजन समितीवर निवड केली जाणार आहे. त्यामुळे या १४ सदस्यांमध्ये नेमकी कुणाला संधी द्यायची यावरसुद्धा सध्या विचारमंथन सुरू असल्याची माहिती आहे.