Breaking

Gondia Zilla Parishad : राष्ट्रवादीला सोबत घेणार का भाजप ?

 

Will BJP shake hands with NCP for local body elections : जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्षाची निवड २४ जानेवारीला

जिल्हा परिषदेत भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसने एकत्र येत सत्ता स्थापन केली होती. अध्यक्षपद भाजपकडे व उपाध्यक्षपद राष्ट्रवादी काँग्रेसकडे होते. पण आता चाबी संघटनेचे सदस्य भाजपमध्ये विलीन झाले आहेत. शिवाय अपक्ष सदस्यसुध्दा भाजपसोबत आहेत. अशात भाजप स्वबळावर सत्ता स्थापन करणार की राष्ट्रवादीला सोबत घेणार, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

भाजप जिल्हा परिषदेत सत्ता स्थापन करु शकते. पण लोकसभा, विधानसभा निवडणुका महायुतीने एकत्र लढल्या. त्यामुळे जिल्हा परिषदेत आधीचेच सूत्र कायम राहण्याची शक्यता आहे. मात्र नवीन समीकरण तयार झाल्यास अध्यक्ष व उपाध्यक्षापदाच्या निवडणुकीत अजित पवार गटासह भाजप सत्ता स्थापन करणार. की राष्ट्रवादीशिवाय सत्ता स्थापन करणार, हे लवकरच कळेल.

Vidarbh Farmers : महागाईने मोडले कंबरडे; शेती करणे झाले अवघड!

विद्यमान जि. प. अध्यक्ष, उपाध्यक्ष व विषयी समिती सभापतींचा अडीच वर्षांचा कार्यकाळ नोव्हेंबर महिन्यात पूर्ण झाला. पुढील अडीच वर्षांकरिता अध्यक्ष व उपाध्यक्ष यांच्या निवडीचा कार्यक्रम जिल्हाधिकारी प्रजित नायर यांनी जाहीर केला आहे. २४ जानेवारीला नव्या अध्यक्ष व उपाध्यक्षांची निवडणूक जिल्हा परिषदेच्या सभागृहात सकाळी ११ वाजता होणार आहे.

अध्यक्ष व उपाध्यक्षपदी कुणाची वर्णी लागते याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. जिल्हा परिषदेत सध्या भाजप व राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता आहे. विधानसभा निवडणुकीत आमदार विनोद अग्रवाल यांच्या चाबी संघटनेचे सर्व सदस्य भाजपमय झाल्याने आत्ता जि. प.मध्ये भाजपचे बळ वाढले आहे. त्यामुळे उपाध्यक्ष व विषय समिती सभापती निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसला पद नको, अशी भूमिका काही भाजपच्या सदस्यांनी घेतली असल्याची चर्चा आहे.

 

Vidarbha Farmers : १ लाख क्विंटल सोयाबीन खरेदी शक्य!

यापूर्वी जिल्हा परिषद अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदासाठी १० मे २०२२ रोजी निवडणूक पार पडली होती. या पदाधिकाऱ्यांचा अडीच वर्षांचा कार्यकाळ नोव्हेंबर २४ मध्ये पूर्ण झाला. पण विधानसभेच्या निवडणुका असल्याने मुदतवाढ देण्यात आली होती. जि. प. निवडणुकीत एकूण ५३ जागांपैकी भाजपने २६ जागा जिंकल्या. मॅजिक फिगर गाठण्यासाठी एका सदस्यांची गरज होती. अपक्ष म्हणून लढलेले पोर्णिमा ढेंगे, सोनू कुथे यांनी भाजपला समर्थन दिले होते, हे विशेष