Breaking

Gondwana University : मुनगंटीवार म्हणाले, स्वप्न होतं विद्यापीठाचं..आज गोंडवाना यशाच्या शिखरावर !

Sudhir Mungantiwar said that the dreamy moment back then is coming to fruition today : गोंडवाना विद्यापीठ आणि ऑस्ट्रेलियातील कर्टिन विद्यापीठ यांच्यात सामंजस्य करार

Chandrapur : गडचिरोली हा एकेकाळचा मागासलेला आणि दुर्लक्षीत जिल्हा. पण गेल्या काही वर्षांपासून हा जिल्हा कात टाकतोय. स्टील उद्योग आणि शिक्षणाच्या क्षेत्रात गडचिरोली जिल्हा भरारी घेतोय. याची सुरूवात राज्याचे माजी वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी गोंडवाना विद्यापीठाची स्थापना करून केली होती. हे विद्यापीठ आता जगाच्या नकाशावर आले आहे.

मुंबईतील राजभवन येथे काल (७ मे) गडचिरोली गोंडवाना विद्यापीठ आणि ऑस्ट्रेलियातील कर्टिन विद्यापीठ यांच्यात मायनिंग क्षेत्रातील अभ्यासक्रम राबवण्यासाठी सामंजस्य करार झाला. राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांच्या अध्यक्षतेखाली आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत हा ऐतिहासिक करार करण्यात आला.

India – Pakistan War : दोन्ही देशांतील नागरिकांना युद्ध नकोय !

या कार्यक्रमाला आमदार सुधीर मुनगंटीवार, ऑस्ट्रेलियाचे मुंबईतील वाणिज्यदूत पॉल मर्फी, गोंडवाणा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे, आमदार डॉ. परिणय फुके, कर्टीन विद्यापीठाचे प्र कुलगुरू मार्क ऑग्डन, उच्च व तंत्रशिक्षण विद्यापीठाचे अतिरिक्त मुख्य सचिव वेणुगोपाल रेड्डी आणि विद्यापीठाच्या व्यवस्थापन समितीचे सदस्य उपस्थित होते.

गोंडवाणा विद्यापीठाचा करार कर्टीन विद्यापीठासोबत झाल्यानंतर आमदार सुधीर मुनगंटीवार म्हणाले की, दुर्गम आदिवासी भागातील युवकांना जागतिक दर्जाचं शिक्षण देण्याच्या उद्देशाने मी जेव्हा गोंडवाना विद्यापीठ स्थापन केलं, तेव्हाचा तो स्वप्नवत क्षण आज फलद्रूप होताना पाहून मनात अभिमान आणि आनंद दाटून आला. धातुशास्त्र, खाणकाम, संगणक विज्ञान आणि अन्य अभियांत्रिकी विषयांत प्रशिक्षणासाठी स्वायत्त टेक्नॉलॉजी इंस्टिट्यूट स्थापन होणार असून ट्विनींक डिग्रीसाठीही संधी उपलब्ध होणार आहे.याबद्दल आ.सुधीर मुनगंटीवार यांनी मा. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांचे आभार मानले आहेत.

Elimination of terrorists : दहशतवाद्यांचा खात्मा आणि स्वाभीमानासाठी काँग्रेसचं समर्थन !

या करारामुळे गोंडवाना विद्यापीठाच्या सीमारेषा रुंदावतील आणि गडचिरोलीसारख्या दुर्गम भागात ज्ञानाचा प्रकाश पसरत जाईल, असा ठाम विश्वास आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केला.