Breaking

Gopal Datkar : गोपाल दातकर यांना उच्च न्यायालयाकडून अंतरिम जामीन मंजूर

Interim bail granted by the High Court : मजीप्रा अधिकाऱ्याला शिवीगाळ व खंडणी मागणी प्रकरण

Akola शिवसेना (ठाकरे गट) चे जिल्हाप्रमुख आणि जिल्हा परिषदेचे माजी सदस्य गोपाल दातकर यांना मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाकडून अंतरिम अटकपूर्व जामीन मंजूर करण्यात आला आहे. मजीप्रा (महाराष्ट्र जीवन प्राधिकरण) च्या अधिकाऱ्याशी फोनवरील वादाच्या प्रकरणात जातीवाचक शिवीगाळ व खंडणी मागितल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे.

सदर प्रकरणात अकोट येथील अधिकाऱ्याने संजय आठवले यांच्या फोनवरून गोपाल दातकर यांच्याशी संपर्क साधला असता, संवादाच्या दरम्यान दातकर यांनी शिवीगाळ व खंडणीची मागणी केल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे. याप्रकरणी विविध कलमांखाली अकोट पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Chandrashekhar Bawankule : पालकमंत्र्यांनी स्पष्टच सांगितले, त्या शेतकऱ्यांना वीज बिलात सलवत नाही

या प्रकरणात गोपाल दातकर यांनी २१ एप्रिल रोजी अकोट सत्र न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केला होता. मात्र, सरकारी पक्षाच्या तीव्र विरोधामुळे न्यायालयाने अर्ज फेटाळून लावला होता. त्यानंतर त्यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात धाव घेतली.

१३ मे रोजी न्यायमूर्ती वृषाली जोशी यांच्या खंडपीठासमोर झालेल्या सुनावणीत, दोन्ही पक्षांची बाजू ऐकून न्यायालयाने गोपाल दातकर यांना काही अटींसह अंतरिम जामीन मंजूर केला. त्यांना १५ हजार रुपयांचा जातमुचालका सादर करावा लागेल. तसेच, त्यांना तपास यंत्रणेला सहकार्य करण्याच्या अटीवर मंगळवारी सकाळी १० ते दुपारी १२ दरम्यान संबंधित पोलिस ठाण्यात हजेरी लावणे बंधनकारक करण्यात आले आहे.

Nagpur Haj House : वर्षानुवर्षे स्वच्छता नाही, पिण्याचे पाणी नाही, लिफ्टही बंद!

शिवाय, आवाजाचा नमुना देण्याचाही आदेश न्यायालयाने दिला आहे. या खटल्यात गोपाल दातकर यांच्यावतीने ॲड. आनंद राजन देशपांडे आणि ॲड. श्रीराम धैर्यवर्धन पुंडकर यांनी युक्तिवाद केला.