Breaking

Gopichand Padalkar : उद्धव ठाकरे सूर्याजी पिसाळाची औलाद… भाजप आमदाराची जीभ घसरली

chorus of counter allegations after Thackeray brothers joint gathering :ठाकरे बंधूंच्या एकत्रित मेळाव्यानंतर प्रत्यारोपाचा कलगीतुरा

Sangli : उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर केलेल्या टीकेला भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले. आहे यावेळी त्यांनी केलेल्या के च्या वेळी त्यांची जीभ घसरली. ठाकरे बंधूंच्या एकत्रित मिळाल्यानंतर उद्धव ठाकरेंनी फडणवीस आणि भाजपवर केलेल्या टीकेला प्रत्येक जण उत्तर देत आहे. यावरून चांगलाच कलगीतुरा रंगला आहे.

सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात एकाच गोष्टीची चर्चा सुरु आहे ती म्हणजे ठाकरे बंधूंचे एकत्रीकरण. तब्बल 19 वर्षांनी राज आणि उद्धव ठाकरे यांनी मराठीचा मुद्द्यावरून एकत्रित विजयी मेळावा घेतला. यानिमित्ताने संपूर्ण ठाकरे कुटुंब एकत्र एका मंचावर आले. यावेळी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी एकमेकांना मिठी मारत नव्या राजकीय समीकरणांची नांदी ठरू शकते याची चुणूक दाखवून दिली. या कार्यक्रमात मनसे नेते अमित ठाकरे आणि आदित्य ठाकरेही एकत्र आले. यावेळी उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा वर टीका केली. त्यावर प्रत्युत्तर देताना भाजप आमदाराची जीभ घसरली.

Sudhir Mungantiwar : सुधीर मुनगंटीवार म्हणाले, नागरिकांच्या हिताचे रक्षण, माझी जबाबदारी !

उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करताना ‘अनाजीपंत’ असा उल्लेख केला. कार्यक्रमाची घोषणा झाल्यानंतर सगळ्यांचं लक्ष आमच्या भाषणांकडे आहे. पण आमच्या भाषणांपेक्षा आमचं एकत्र दिसणं महत्त्वाचं आहे. आमच्यात जो काही आंतरपाट होता तो अनाजीपंतांनी दूर केला, असे उद्धव ठाकरे म्हणाले. त्या टीकेला भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी उत्तर दिले. ते सांगलीतील जतमध्ये बोलत होते.

Raj – Uddhav Thackeray : यापेक्षा जास्त गर्दी आमच्या प्रदेशाध्यक्षांच्या पदग्रहण सोहळ्याला होती !

यावेळी पडळकर यांनी उद्धव ठाकरेंवर जोरदार निशाणा साधला. ‘ उद्धव ठाकरे हे सूर्याजी पिसाळाची औलाद आहेत’, अशा शब्दात पडळकरांनी टीका केली. ठाकरे बंधूंच्या एकत्रिकरणानंतर भाजपकडून त्यांच्यावर शाब्दिक हरले चढवण्यात येत आहेत. यावरून शिंदे गटही आक्रमक झाला आहे. यातच पडळकर यांनी केलेल्या या विधानाने वाद वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे.