Padalkars scathing criticism again without mentioning Pawars name : पडळकर यांची पवारांचे नाव न घेता पुन्हा विखारी टीका
pune : वादग्रस्त वक्तव्य करून खळबळ उडवून देण्यात अग्रेसर असलेले भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी पुन्हा एकदा पवार कुटुंबियांचे नाव न घेता विखारी टीका केली आहे. यावेळी त्यांनी गलिच्छ भाषेचा वापर केला आहे. बाप मराठा, सासू ख्रिश्चन, नवरा ब्राह्मण, अन् आई दुसरीच, पुण्यात असं एक कॉकटेल घर आहे. असे पडळकरांनी म्हणले आहे. हे कुटुंबीय एकादशीच्या दिवशी मटण खाऊन दगडूशेठ गणपतीला जातं असंही ते म्हणाले. पडळकर यांच्या या वक्तव्यावर वाद निर्माण होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
सांगलीतील ऋतुजा पाटील हत्या प्रकरणी पुण्यामध्ये हिंदुत्ववाद्यांनी मोर्चा काढला होता. या मोर्चामध्ये भाषण करत असताना गोपीचंद पडळकरांनी पवार कुटुंबीयांवर नाव न घेता ही खरी टीका केली. त्यांनी केलेल्या टिके चा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. पडळकर म्हणाले , एका गटाचे लोक एका मोर्चामध्ये पुढे पुढे करत आहेत. ते घर पण तसंच आहे. संकष्टीच्या दिवशी उपवास असतो त्या दिवशी घरामध्ये मटण आणायचं. एकादशी च्या दिवशी चिकन आणायचं. ते घर पण तसंच आहे.
Chief Justice : सरन्यायाधीशांपुढे विरोधकांचे ‘रडगाणे’, राजकीय नाट्याचा ‘प्रयोग’
त्या घरातील लोक एकादशीच्या दिवशी दगडू शेठ गणपतीला मटण खाऊन जातात. तुम्हाला माहिती आहे ते घर कोणतं आहे. तिची सासू खिश्चन आहे, नवरा ब्राह्मण आहे, बाप मराठा आहे आणि आई दुसरीच आहे. असं ते कॉकटेल कुटुंबीय आहे. असा म्हशी टीका पडळकर यांनी केली. पडळकरांनी केलेल्या या टीकेला राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रशांत जगताप यांनी प्रत्युत्तर दिलं. ते म्हणाले की, गोपीचंद पडळकर ही एक प्रवृत्ती आहे. त्यांनी पवार कुटुंबीयांबद्दल गलिच्छ भाषा वापरली. ज्यांची ग्रामपंचायतीमध्ये निवडून येण्याची लायकी नाही अशांना भाजपकडून पदं दिली जातात आणि विरोधी पक्षातील नेत्यांवर अशा शब्दात बोलायला लावलं जातं.
opposition leader : विरोधक आक्रमक पण…विरोधी पक्ष नेते पदाचा तिढा कायमच
मंगळसूत्र चोरीच्या प्रकरणी गोपीचंद पडळकरांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या होत्या. अशांची पवार कुटुंबीयांवर बोलण्याची लायकी नाही. येणाऱ्या काळात महाराष्ट्रातली जनता त्याला योग्य ते उत्तर देईल असं प्रशांत जगताप म्हणाले. पडळकरांनी या आधीही पवार कुटुंबीयांबद्दल बोलताना अनेकदा गलिच्छ भाषा वापरली आहे. त्यावर सत्ताधारी नेत्यांकडून काहीही प्रतिक्रिया येत नाही. प्रसंगी ते त्यांचे वैयक्तिक मत आहे. अशी कोणावरही टीका करणे चुकीचेच आहे एवढेच बोलले जाते. दुसरीकडे भाजप विरोधी नेते आणि पवार कुटुंबीय यांना पडळकर यांनी टार्गेट केल्या असून वारंवार ते अशाच शब्द टीका करताना दिसतात.
आताही पडळकरांनी पवार कुटुंबीयांवर आक्षेपार्ह भाषा वापरून टीका केली. त्यावर वाद होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.