Governor of Maharashtra : ‘सप्रेम भेट योजना’ सुरू करा; विवाहवंचित तरुणांसाठी राज्यपालांना साकडे

Demand to provide Rs 11 lakh for marriage of smallholder, uneducated youth : अल्पभूधारक, अशिक्षित तरुणांच्या विवाहासाठी ११ लाख रुपये देण्याची मागणी

Akola राज्यातील अशिक्षित, भूमिहीन व अत्यल्पभूधारक तरुणांना विवाह जुळविण्यात गंभीर अडचणी येत असून, हे तरुण अनेक वर्षांपासून विवाहापासून वंचित आहेत. त्यामुळे या तरुणांसाठी ‘११ लाख रुपयांची सप्रेम भेट योजना’ राज्य शासनाने तातडीने सुरू करावी, अशी मागणी माजी राज्यमंत्री सुबोधभाऊ सावजी यांनी केली आहे. १२ जुलै रोजी मुख्यमंत्र्यांना सादर करण्यात आलेल्या निवेदनातून ही मागणी करण्यात आली.

सावजी यांनी निवेदनात नमूद केले आहे की, मागील १० ते १५ वर्षांपासून ग्रामीण भागातील अनेक तरुण विवाह न होऊन वंचित राहिले आहेत. परिणामी, राज्यात विवाहाचे प्रमाण घटले असून, त्यामुळे जन्मदरातही मोठी घट झाली आहे. या घटत्या जन्मदराचा थेट परिणाम प्राथमिक शाळांतील नव्या प्रवेशांवर होत आहे.

Another scam in the education sector : शासन मान्यता नसतानाही २०० हून अधिक प्रयोगशाळा सहाय्यकांची बोगस भरती;

लग्न ही मुलभूत सामाजिक गरज असून सरकारने याकडे गांभीर्याने लक्ष दिले पाहिजे, असे मत व्यक्त करत सावजी यांनी इशारा दिला आहे की, विवाहवंचित तरुणांमध्ये असंतोष वाढल्यास त्यांच्याकडून नक्षलवादी विचारांकडे वळण्याची शक्यता नाकारता येणार नाही.

सावजी यांनी सुचवले आहे की, योजनेअंतर्गत लाभ मिळविल्यानंतर जर कोणत्याही लाभार्थ्याने शासनाची फसवणूक केली, तर त्यांच्यावर एफआयआर दाखल करून कठोर शिक्षा देणारा स्वतंत्र कायदा राज्य शासनाने लागू करावा. तसेच, या योजनेसाठी अभ्यास समिती गठित करून धोरणात्मक निर्णय घेण्याची गरज त्यांनी व्यक्त केली आहे.

Nashik Honey Trap : वेळ आल्यास, नाशिक हनी ट्रॅप’ची सीडी तिकीट लावून दाखवू !

ही योजना फक्त सामाजिक नव्हे, तर राज्याच्या शैक्षणिक व लोकसंख्यात्मक भविष्यासाठीही अत्यंत महत्त्वाची आहे. त्यामुळे शासनाने या योजनेचा गांभीर्याने विचार करून तात्काळ निर्णय घ्यावा, अशी ठाम मागणी सुबोध सावजी यांनी केली आहे.