The country needs to become self-reliant in terms of defense : राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन; विरोधकांच्या आरोपांवरही व्यक्त केली नाराजी
Nagpur आपल्या देशाला संरक्षणाच्या दृष्टीने आत्मनिर्भर हाेण्याची गरज आहे. त्यासाठीच सरकारने संरक्षण क्षेत्र खासगी उत्पादकांसाठी खुले केले आहे. अशात सरकार संरक्षणाची गुप्त माहिती विकायला निघाले, हा विराेधकांचा आराेप बिनबुडाचा आहे, अशी टीका राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांनी केली. आपल्याच देशात उत्पादन केल्यावर गुप्त माहिती बाहेर कशी जाईल, असा सवालही त्यांनी केला.
राष्ट्रीय संरक्षण उत्पादकता अकादमी (एनएडीपी) तर्फे एआयसीटीईअंतर्गत मान्यताप्राप्त दाेन वर्षांचा बिजनेस मॅनेजमेंटच्या पदव्युत्तर पदविका (पीजीडीएम) अभ्यासक्रमाच्या पहिल्या बॅचचा दीक्षांत समारंभ शनिवारी एनएडीपीच्या सभागृहात पार पडला. याप्रसंगी ते बोलत होते. सध्या जगात अस्थिरतेचे वातावरण आहे.
Chandrashekhar Bawankule : जंगलाजवळच्या शेती पडीत राहणार नाहीत, बावनकुळेंनी सांगितला मार्ग !
संरक्षण क्षेत्रासाठी आवश्यक साहित्याच्या उत्पादनात खासगी उद्याेजकांच्या प्रवेशाने संरक्षण क्षेत्रात आत्मनिर्भर भारताकडे वाटचाल सुनिश्चित केली आहे. मात्र, विराेधकांना यातही राजकारण सुचणे अनाकलनीय आहे. वास्तविक संरक्षण दलासाठी लागणाऱ्या प्रत्येकच गाेष्टी आपण आतापर्यंत परदेशांकडून आयातच करीत हाेताे. याचा अर्थ परकीयांना आपल्या गुप्त गाेष्टी माहितीच असतात. आता स्वकीयांनी या क्षेत्रात सहभाग घेतल्याने गुप्तता धाेक्यात येण्याचे कारण काय? हा निव्वळ विराेधकांचा दावा तथ्यहीन आहे, अशी असंही ते म्हणाले.
अनेक देशांमध्ये युद्धसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. पाकिस्तानसारखे भारताचे शेजारी राष्ट्रही कुरापती करताहेत. येत्या काळात संरक्षण क्षेत्रात नव्या संशाेधनाची, तंत्रज्ञानाची माेठी गरज पडणार आहे. तेव्हा संरक्षण अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना प्रचंड संधी उपलब्ध हाेणार आहेत, तेव्हा त्यांनी संयम ठेवून तयार राहावे, असे आवाहन राधाकृष्णन यांनी केले.