Breaking

Gram Panchayat : ग्राम पंचायत संगणक चालकांवर उपासमारीची वेळ !

Gram panchayat computer operator in financial crisis : पाच महिन्यांपासून मानधन मिळेना; उधार उसनवारी करून काढताहेत दिवस

Tiroda Sudki Dakram तिरोडा तालुक्यातील ९५ ग्रामपंचायतींमधील मानधन तत्त्वावर काम करणाऱ्या संगणक चालकांचे मानधन गेल्या पाच महिन्यांपासून रखडले आहे. परिणामी, त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे.

महाराष्ट्र शासनाने ग्रामपंचायतींचा लेखाजोखा हा संगणीकृत व दीर्घकाळ टिकावा. म्हणून एनजीओच्या माध्यमातून ११ महिन्यांसाठी प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये एका संगणक चालकाची नियुक्ती मानधन तत्त्वावर केली. त्यांना अल्प मानधन देऊन त्यांच्याकडून कामे करून घेतली जात आहेत. गेल्या ११ वर्षांपासून ते मानधन तत्त्वावर काम करीत आहेत. अनेक ग्रामपंचायतींमध्ये ऑपरेटर ऑनलाइनच्या माध्यमातून ग्रामपंचायतींची विविध कामे करीत असतात. त्यात गावकऱ्यांना दाखले देणे, पत्रव्यवहार करणे, प्रस्ताव तयार करणे आदींचा समावेश आहे.

Shivdeep Lande : गुन्हेगारांना धडकी भरवली; आता कुणाला भरवणार?

लाडकी बहीण योजना, पीएम किसान योजना, प्रधानमंत्री आवास योजना, माझी वसुंधरा अभियान राबविणे, फार्मर आयडी, विविध शासकीय योजना हे गावखेड्यांपर्यंत पोहोचविण्याचे काम संगणक चालक करीत आहेत. पण गेल्या पाच महिन्यांपासून मानधन न मिळाल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. उधार उसनवारी करून त्यांना कुटुंबाचा उदरनिर्वाह करावा लागत आहे.

एक वरिष्ठ अधिकाऱ्याच्या आदेशावरून ३१ जानेवारीपर्यंत वार्षिक आराखडा तयार करण्याचे आदेश दिले. त्या आदेशाचे पालन करीत संगणक चालकांनी दिवसरात्र एक करून आराखडा तयार केला. पण आता याच संगणक चालकांवर मानधन रखडल्याने उपासमारीची वेळ आली आहे. त्यांच्याकडे लक्ष देण्यास कुणीच तयार नाही.

Manikrao Kokate : आता कृषीमंत्री म्हणतात, ‘शेती कणा, शेतकरी केंद्रबिंदू’

गेल्या पाच महिन्यांपासून तिरोडा तालुक्यातील ९५ ग्रामपंचायतींमध्ये कार्यरत संगणक चालकांचे मानधन रखडले आहे. त्यामुळे शासन आणि प्रशासनाने याची गांभीर्याने दखल घेऊन थकीत मानधन त्वरित द्यावे, असं संगणक चालक संघटनेच्या अध्यक्षांनी म्हटलं आहे.