Breaking

Grievance Redressal Camp : पाणी मिळालंच नाही, पण बिल आले!

 

Citizens didn’t get water, but the bill generated : अकोल्यात नागरिकांनी मांडल्या तक्रारी, विशेष शिबिरास प्रतिसाद

Akola शहरातील पाणीपट्टीवरील अन्यायाविरोधात नागरिकांनी आता ठाम पावले उचलली आहेत. ‘एड. धनश्री देव स्मृती सेवा प्रकल्प’ आणि ‘निलेश देव मित्र मंडळ’ यांच्या संयुक्त पुढाकाराने विशेष तक्रार निवारण शिबिराला सुरूवात झाली.

पहिल्याच दिवशी मोठ्या प्रमाणात नागरिकांनी सहभाग नोंदवत या मोहिमेला जनआंदोलनाचं स्वरूप दिलं आहे. विशेष म्हणजे अनेक नागरिकांनी पाणी आलं नाही तरी बील आल्याची तक्रार नोंदवली.

मार्चमध्ये आझाद मैदानावर झालेल्या निदर्शनांनंतर आयुक्तांशी बैठक झाली, मात्र अद्याप ठोस कार्यवाही नाही. त्यामुळे या नव्या उपक्रमातून जनतेचा रोष पुन्हा उफाळून आला आहे.

Water quality committee’s report : गोंदियातील पाणी दुषित, १०४ गावांना ‘रेड कार्ड’!

“लोकशाहीत प्रश्न विचारणं गुन्हा नाही, अधिकार आहे,” असं म्हणत निलेश देव यांनी यावेळी स्पष्ट भूमिका मांडली. शिबिरात प्राप्त तक्रारींचं संकलन करून २० मे रोजी आयुक्तांना निवेदन दिलं जाणार आहे. गरज भासल्यास आंदोलनाचा दुसरा टप्पा राबवला जाणार आहे.

मुख्य तक्रारी
पाणी न मिळता बिल, चुकीचं रीडिंग, मागास भागांतही आकारणी
मीटर नसतानाही बिल
नळजोडणी वापरलीच नाही तरीही शुल्क
हद्दवाढ भागांना मागील तारीखीनं बिल
चुकीचं रीडिंग आणि आर्थिक फटका

Urjanagar : मुख्य अभियंत्यांसोबतची चर्चा ऊर्जा नगरच्या विकासात ठरणार मैलाचा दगड !

शिबिरात काय मिळणार?
बिल पडताळणी
लेखी तक्रार अर्ज
कायदेशीर मार्गदर्शन
तक्रारी संकलन व सादरीकरण

शिबिर ४ ते १८ मे दरम्यान, सकाळी ११-१ व सायंकाळी ६-८ या वेळेत पुष्कर अपार्टमेंट, सातव चौक येथे सुरू आहे.