Villages are under water, now fear of earthquakes : गावे पाण्यात असतानाच आता भूकंपाची भीती,
Latur : मराठवाड्यात सध्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं असताना निलंगा तालुक्यातील कलांडी, खडक उमंरगा आणि डांगेवाडी या तीन गावात अवघ्या दोन तासांत पाच वेळा भूगर्भातून मोठा आवाज आल्याने नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. या आवाजासोबत जमिनी हलल्याचा भास झाल्याचं स्थानिकांनी सांगितलं असून, गावकऱ्यांनी रात्रीभर पावसात रस्त्यावर काढली.
गावकऱ्यांच्या म्हणण्यानुसार, अचानक झालेल्या या घटनेमुळे घरांच्या भिंती हादरल्याची जाणीव झाली. त्यामुळे शेकडो नागरिक घराबाहेर पळत गेले. रात्रीभर प्रशासनाकडे संपर्क साधूनही कोणीही घटनास्थळी आले नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.
Teachers’ constituency : शिक्षक मतदारसंघासाठी चुरस; आजपासून मतदार नोंदणी
स्थानिक नागरिकांनी याला भूकंपाचा इशारा मानत भीती व्यक्त केली असून, अनेकांना 1993 च्या किल्लारी भूकंपाच्या काळ्या आठवणी पुन्हा डोळ्यांसमोर उभ्या राहिल्या आहेत. गणपती विसर्जनानंतरच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच 30 सप्टेंबर 1993 रोजी पहाटे झालेल्या भूकंपात 7 हजारांहून अधिक लोक मृत्युमुखी पडले होते, 16 हजार जखमी झाले होते, तर हजारो घरे उद्ध्वस्त झाली होती.
Manikrao Thakre : बोल घेवड्या सरकारचे वेळकाढू धोरण; काँग्रेस नेत्याची टीका
आजही तो काळा दिवस विसरता आलेला नाही आणि अशाच प्रकारच्या भूगर्भीय हालचालींमुळे निलंगा तालुक्यातील नागरिकांना मोठी भीती वाटू लागली आहे. त्यामुळे तातडीने भूगर्भशास्त्रज्ञांची मदत घेऊन प्रशासनाने याची चौकशी करावी आणि नागरिकांना दिलासा द्यावा, अशी मागणी होत आहे.