Breaking

Guardian Minister Makrand Patil : सैलानी यात्रेत यंदा पाच लाख भाविक!

 

Five lakh devotees are likely to come this year for the Sailani Yatra : प्रशासनाला अंदाज; पालकमंत्र्यांच्या सोयीसुविधांसाठी सूचना

Buldhana बुलढाणा तालुक्यातील पिंपळगाव सराई येथे दि. ८ ते २३ मार्च या कालावधीत सैलानी बाबा यात्रा महोत्सव साजरा होणार आहे. यंदा पाच लाखांपेक्षा अधिक यात्रेकरी येतील, असा अंदाज प्रशासनाने व्यक्त केला आहे. या यात्रा महोत्सवात आवश्यक सोयीसुविधांचे सूक्ष्म नियोजन करण्याचे निर्देश पालकमंत्री मकरंद पाटील यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत.

त्यानुषंगाने जिल्हाधिकारी डॅा. किरण पाटील यांनी सोमवारी त्यांच्या कार्यालयात यात्रेच्या पूर्व तयारीची समन्वय सभा घेतली. या बैठकीत मुख्य कार्यकारी अधिकारी गुलाब खरात, पोलीस अधीक्षक विश्व पानसरे यांच्यासह विविध विभागाचे प्रमुख उपस्थित होते.

Gajanan Maharaj Prakat Din : गजानन महाराज हे भक्ती, कर्मयोग, अध्यात्माचा संगम !

पालकमंत्री मकरंद पाटील यांनी सैलानी यात्रा महोत्सवात भाविकांसाठी पिण्याच्या पाण्याची सुविधा, शौचालय, परिसर स्वच्छता, पोलिस बंदोबस्त आदी सोयीसुविधा उपलब्ध करण्याच्या सूचना दिल्या. त्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी डॅा. पाटील यांनी आढावा घेतला.

देशभरातून ४-५ लाख भाविक सहभागी होण्याची शक्यता आहे. त्यानुषंगाने कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी सीसीटिव्ही कॅमेरे बसवणे, महिला सुरक्षेच्या दृष्टीने उपाययोजना करणे, विद्युत सुविधा पुरविणे, स्वच्छता गृह तयार करणे, पार्किंग व्यवस्था निर्माण करणे, सार्वजनिक शौचालय उभारणे, अग्निशमन यंत्रणा कार्यान्वित ठेवणे, पोलीस बंदोबस्त, बॅरिकेट्स, आरोग्य कक्ष व औषधींचा साठा उपलब्ध करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या.

राज्यभरात प्रसिद्ध असलेल्या सैलानी यात्रेसाठी भाविक येण्यास सुरूवात झाली आहे. अनेक भाविक राहुट्या करून करून मुक्काम करतात़ त्यासाठी भाविकांचे आगमन झाले आहे. राहुट्या उभारण्यात येत आहेत. मनाेरुग्ण या यात्रेत बरे हाेतात, अशी भाविकांची श्रद्धा आहे. त्यामुळे, या यात्रेत भाविक माेठ्या संख्येने येतात. यात्रेचे प्रशासनाकडून नियाेजन करण्यात आले आहे.