Breaking

Guardian Minister Sanjay Rathod : यवतमाळचे शिक्षण क्षेत्र राज्यात ठरेल ‘मॉडेल’

The education sector of Yavatmal will become a ‘model’ in the state : संजय राठोड म्हणाले, ‘शिक्षण क्षेत्राला पुढे नेण्याचा प्रयत्न’

Yavatmal जिल्ह्याच्या शिक्षण क्षेत्राला पुढे नेण्यासाठी माझी सातत्याची भूमिका राहिली आहे. त्यामुळेच मॉडेल शाळेसारखा उपक्रम आपण राबवत आहोत. राज्यातील हा पहिलाच उपक्रम आहे. या माध्यमातून जिल्ह्यातील शिक्षण क्षेत्र राज्यात मॉडेल ठरेल, असा विश्वास पालकमंत्री संजय राठोड यांनी व्यक्त केला.

दारव्हा तालुकास्तरीय कला, क्रीडा, कबबुलबूल महोत्सवाचे आयोजन तालुक्यातील रामगाव (रामे) येथे करण्यात आले आहे. महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी पालकमंत्री बोलत होते. यावेळी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष कालिंदा पवार, सरपंच उन्नती राऊत, तहसिलदार रवींद्र काळे, गटविकास अधिकारी बाळासाहेब रायबोले, गटशिक्षणाधिकारी विलास जाधव, कृषी अधिकारी राजीव शिंदे, शाळा समिती अध्यक्ष शेख नब्बू शेख बन्नू, सदस्य यशवंत पवार, शालेय पोषण अधीक्षक वंदना नाईक, शिक्षण विस्तार अधिकारी क्रांती खेडकर आदी उपस्थित होते.

Sudhir Mungantiwar : मुनगंटीवारांचा एक कॉल अन् सोनपेठ तीर्थस्थळाचा प्रश्नच सुटला!

खाजगी शाळांमध्ये भरमसाठ फी आकारली जाते. त्यामुळे या शाळांमध्ये शिक्षणाचा फार मोठा बोझा पालकांवर पडतो. त्यामुळे शासकीय शाळांमध्येच चांगले शिक्षण उपलब्ध होणे आवश्यक आहे. त्यासाठी जिल्ह्यात आपण मॉडेल स्कूल संकल्पना राबवत आहोत. सद्या २०० विद्यार्थी संख्या असलेल्या शाळा आपण घेतल्या आहेत, अशी माहिती देखील पालकमंत्र्यांनी दिली.

या शाळांसह जिल्ह्यातील इतरही शाळांमध्ये पाणी, जिम, खेळाचे साहित्य, संगणक उपलब्ध करुन दिले जात आहे. मुलांना सर्व प्रकारे उत्तम सुविधा देण्याचा प्रयत्न आहे, असे पालकमंत्री म्हणाले. लहान स्पर्धांमधूनच मोठे खेळाडू तयार होत असतात. त्यामुळे या केवळ तालुकास्तरीय स्पर्धा नाहीत तर मुले घडविणाऱ्या स्पर्धा आहेत. कला, क्रीडा महोत्सव विद्यार्थ्यांना घडवितात, असंही ते म्हणाले.

Mahatma Gandhi : ‘या’बाबतीत गांधींचे जीवन क्रांतीकारी!

यश, अपयशाचा विचार न करता विद्यार्थ्यांनी जिंकण्याच्या जिद्दीने खेळण्याचा प्रयत्न करणे महत्त्वाचे आहे. कबबुलबुल, स्काऊट गाईड देशभक्ती, अनुशासन, सेवा भावना शिकविते. त्यामुळे कबबुलबुल मेळावे देखील विद्यार्थ्यांसाठी महत्वाचे आहेत. शाळा शिक्षणाचे केंद्र आहे, सोबतच ते विविध प्रयोगाचे केंद्र झाले पाहिजे. तालुकास्तरीय महोत्सवाच्या आयोजनासाठी निधी वाढविण्याचा प्रयत्न करु, असे पुढे बोलताना पालकमंत्री म्हणाले.