Breaking

Chandrashekhar Bawankule : बावनकुळेंचा सीसीटीव्हीवरून कठोर पवित्रा !

Guardian Minister’s strict stance on CCTV : कंत्राटदार कंपनीला सुनावले; १० कोटींचा निधी देणार

Nagpur उपराजधानीतील अनेक गुन्ह्यांची उकल करण्यात सीसीटीव्हींचा मौलिक वाटा राहिला आहे. मात्र मागील काही दिवसांपासून ५५ टक्के सीसीटीव्ही कॅमेरे विविध कारणांनी बंद आहेत. हे सीसीटीव्ही कॅमेरे १५ दिवसांत सुरू करावेत असे निर्देश महसूलमंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले आहेत. यासाठी १० कोटींचा निधीदेखील उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

नागपूर शहरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचा आढावा घेण्यासाठी बावनकुळे यांनी मंत्रालयात बैठक बोलावली होती. या बैठकीला माहिती तंत्रज्ञान विभागाचे मंत्री आशिष शेलार, माहिती तंत्रज्ञान विभागाचे प्रधान सचिव पराग जैन नैनुटिया, नागपूर महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. अभिजित चौधरी, नागपूर महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्त तथा नागपूर स्मार्ट सिटी प्रकल्पाच्या प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी आंचल गोयल आदी उपस्थित होते. तर पोलिस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल हे ऑनलाइन उपस्थित होते.

FDA’s authority removed : FDA चे अधिकार काढले; शहराचे आरोग्य धोक्यात!

नागपूर शहरात एल अँड टी कंपनीकडून सुमारे ३६०० कॅमेरे बसविण्यात आले होते. त्यातील २००० कॅमेरे बंद आहेत. यापैकी ११०० कॅमेरे हे विविध प्रकारची कामे सुरू असल्याने बंदस्थितीत असल्याचे कंपनीकडून सांगण्यात आले. नागपूर शहरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमुळे गुन्ह्याचा शोध घेणे सोपे होईल. चोरी, खून, दरोडा तसेच अपघातातील गुन्ह्यांचा शोध घेण्यासाठी हे कॅमेरे उपयोगी ठरणार आहेत.

Chandrashekhar Bawankule : या निर्णयाने मिळणार उद्योगांना Boost!

त्यामुळे बंद असलेले कॅमेरे १५ दिवसांत दुरुस्त करून ते कार्यान्वित करावेत, असे निर्देश बावनकुळे यांनी दिले. तसेच कंपनीने दुरुस्त करून सुरू केलेले कॅमेरे चांगल्या पद्धतीने काम करत आहेत की नाही हे बघावे. त्यासाठी पोलिस आयुक्तालयातील माहिती आणि तंत्रज्ञान या विषयाचे विशेष ज्ञान असणाऱ्या पथकाने याची पाहणी करावी, असेही आदेश बावनकुळे यांनी पोलिस आयुक्तांना दिले.