Breaking

Guardian Ministership controversy : अमित शाह येऊनसुद्धा पालकमंत्रिपदाचा वाद मिटला नाही !

 

Vijay Wadettiwar said after Amit Shah’s tour, dispute of Nashik guardian minister not solved. : तीन पक्ष मिळून काम करत असल्याचे चित्र निर्माण करण्याचा अयशस्वी प्रयत्न

Nagpur : महायुतीमध्ये नाशिक आणि रायगड या दोन जिल्ह्यांच्या पालकमंत्रिपदासाठी वाद सुरू आहेत. हा वाद थेट देशाचे गृहमंत्री अमित शाह यांच्या दरबारी गेला होता. त्यानंतर शाह यांचा महाराष्ट्र दौरा झाला. यावेळी तरी हा वाद मिटेल आणि या दोन्ही जिल्ह्यांना पालकमंत्री मिळतील, अशी अपेक्षा जागृत झाली होती. पण या वादावर तोडगा निघालाच नाही. त्यामुळे या सरकारमध्ये सर्वकाही आलबेल नाही, असे काँग्रेसचे विधीमंडळ नेते विजय वडेट्टीवार म्हणाले.

महाराष्ट्रात लाडक्या बहीणींचे तिघे भाऊ एकत्र मिळून काम करत असल्याचे चित्र निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. पण त्यात महायुतीतील तिन्ही पक्षांचे नेते अपयशी ठरत आहेत. तिघांची तोंडे तिन दिशांना आहेत. याचा अर्थ त्यांना जनतेशी काही देणंघेणं नाही. सत्ता आणि खुर्चीसाठी सर्व भांडणे आहेत. राज्यात सर्वत्र ‘तीन तिघाडा – काम बिघाडा’, सुरू असल्याची टीका वडेट्टीवार यांनी केली.

Vijay Wadettiwar : अरे..! येथेही स्वतःचे मार्केटींग करताय का ? वडेट्टीवार संतापले..

नाशिकच्या पालकमंत्रिपदाच्या वादाचा दुसरा अंक पुढील मे महिन्यात रंगण्याची दाट शक्यता दिसत आहे. कारण पालकमंत्री जरी निवडले नाहीत, पण १ मे रोजी झेंडावंदनाचा मान कुणाला दिला गेला, यावरून महायुतीमध्ये कलगीतुरा रंगण्याची चिन्हे आतापासूनच दिसू लागली आहेत. त्यामुळे पालकमंत्रिपदाचा तिढा वाढतच जाणार आहे, तो आताशा सुटेल असे वाटत नाही, असेही वडेट्टीवार म्हणाले.

Kashmir terrorist attack : चॅनल्सना विनंती आहे की, माझं पूर्ण वक्तव्य दाखवा !

शिक्षक भरती प्रकरणातील घोटाळ्यासंदर्भात वडेट्टीवार म्हणाले की, शिक्षक भरती तपासात ईडी ची एंट्री झाल्याचे कळले. केवळ एकाला अटक करून ही चौकशी पूर्ण होणार नाही. तर उच्चस्तरीय न्यायालयीन समिती नेमून याची चौकशी झाली पाहिजे. दोषींवर कारवाई व्हावी, ही आमची मागणी आहे.