Gulabrao Patil : “बताओ कलेक्टर बडा है या गुलाबराव पाटील बडा है?”

Minister Gulabrao Patil’s stormy scolding in Buldhana : मंत्री गुलाबराव पाटलांची बुलढाण्यात तुफान फटकेबाजी

Buldhana : राज्याचे जलपुरवठा मंत्री आणि शिवसेना शिंदे गटाचे नेते गुलाबराव पाटील यांनी बुलढाण्यात खासदार श्रीकांत शिंदे यांच्या उपस्थितीत केलेल्या भाषणाने राजकीय वातावरण तापवले आहे. “बताओ कलेक्टर बडा है या गुलाबराव पाटील बडा है? हम जीआर भी निकलते है और तुम्हारा सीआर भी निकालते है!” अशा शब्दांत त्यांनी प्रशासनावर आणि विरोधकांवर तुफान फटकेबाजी केली.

गुलाबराव पाटील म्हणाले, “मी बारावी पास झालो, कॉलेज शिकू शकलो नाही. पण बाळासाहेब ठाकरे यांनी मला विधानसभेचे तिकीट दिले आणि कायदा बनवणाऱ्या मंडळात बसवले. आज मी मंत्री आहे. सरकार दोन गोष्टींवर चालतं जीआरवर आणि सीआरवर. आणि आम्ही दोन्ही काढतो, जीआरही आणि तुमचा सीआरही!” या वक्तव्याने सभागृहात हास्यकल्लोळ उडाला.

Ladki bahan Yojana : ‘माझी लाडकी बहीण’ योजनेतील लाभार्थ्यांच्या हाती फक्त १२ दिवस

यावेळी त्यांनी आपल्या खास शैलीत ठणकावले, “ही ताकद आहे लोकप्रतिनिधीची. त्यामुळे फ्रेश राहा, कधी जीव जाईल सांगता येत नाही!” संजय राऊत यांच्या तब्येतीबाबतही त्यांनी भाष्य केलं. “बघा ना माझा संजय राऊत कसा ऍडमिट आहे. वो मेरा माल है भाई, माल है. तो वाचला पाहिजे. देवाला प्रार्थना केली की त्याला सद्‍बुद्धी दे,” असं म्हणत त्यांनी राऊत यांच्याबद्दल काळजी व्यक्त केली, पण लगेचच टोमणा मारत जोडले, “सत्यानाश करणाऱ्यांना देवाने चांगली बुद्धी दिली तर उद्धव ठाकरेंसोबत जे २० लोक आहेत ते तरी टिकतील.”

Parth Pawar : अजित पवारांचे सुपुत्र पार्थ पवार जमीन घोटाळ्यात अडकले?

गुलाबराव पाटील म्हणाले, “आमच्यावर पोलीस केस झाली नाही तर आम्ही शिवसैनिकच नाही, ही आमची परंपरा आहे. एका केसमध्ये मी, माझा लहान भाऊ, मोठा भाऊ आणि माझा बाप एकाच बॅरेकमध्ये होतो!”

शेवटी त्यांनी आपल्या ओळखीच्या दमदार शैलीत भाषण संपवले, “आमचे संजय गायकवाड डॉन आहेत. आम्हाला गुंडा म्हणतात, पण अरे शंड असण्यापेक्षा गुंडा असलेला चांगला! पुत्र हो असा ज्याच्या हाती हो भगवा झेंडा, जो फोडे उबाठा वाल्यांचा भ्रष्टाचारी हंडा!”

गुलाबराव पाटलांच्या या भाषणामुळे बुलढाण्यातील राजकीय वातावरण चांगलेच रंगले असून, त्यांच्या वक्तव्यांवर विरोधकांकडून तीव्र प्रतिक्रिया उमटण्याची शक्यता आहे.