A new disease of cracks on hands in Shelgaon Deshmukh village : बुलढाणा जिल्ह्यात चाललंय काय?; २० जणांना आढळला नवा आजार
Buldhana जिल्ह्यात केस आणि नखं गळण्याची असाधारण साथ पसरली. नागरिक आणि आरोग्य यंत्रणा या धक्क्यातून सावरायचीच आहे. तर आता मेहकर तालुक्यातील शेलगाव देशमुख येथे हातांवर भेगा पडण्याचा एक नवा आजार आढळला आहे. या गावातील सुमारे 20 जणांमध्ये ही लक्षणे आढळल्यानंतर आरोग्य विभाग सतर्क झाला आहे. एक विशेष पथक तपासणीसाठी घटनास्थळावर पाठवण्यात आले आहे.
केंद्रीय आरोग्य व आयुष राज्य मंत्री प्रतापराव जाधव यांचा हा मतदारसंघ आहे. या प्रकाराने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहेत अस्वस्थता वाढवली आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदेचे साथरोग व सर्वेक्षण अधिकारी डॉ. प्रशांत तांगडे, वैद्यकीय अधिकारी व त्वचाविकार तज्ञ डॉ. बालाजी आद्रट, स्थानिक वैद्यकीय अधिकारी डॉ. माधुरी मिश्रा, आरोग्यसेवक, आरोग्यसेवक व आशासेविकांनी प्रभावित रुग्णांची तपासणी केली.
MLA Manoj Kayande : रस्ते खोदल्यामुळे नागरिकांचे हाल; प्रशासनाचा ताल
तपासणीदरम्यान एकूण 20 पैकी 14 जणांमध्ये ‘पामो-प्लांटर एक्झिमा’ Palmoplantar eczema, ‘पामो-प्लांटर केराटोडर्मा’ Palmoplantar keratoderma व ‘पामो-प्लांटर सोरायसिस’ Palmoplantar psoriasis असलेल्या चर्मरोगाचा निष्कर्ष आला. या रोगांमध्ये हात व पायाच्या तळव्यांवरील त्वचेला चिरा पडणे, कोरडेपणा, खाज व जळजळ अशी लक्षणे असतात. काही रूग्णांमध्ये ही समस्या 12 महिन्यांपासून ते 5 वर्षांपर्यंत असावा, असा अंदाज व्यक्त करण्यात आला.
आरोग्य अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या चर्मरोगाचा संसर्ग होत नसला तरी तो आटोइम्युन स्वरूपाचा Autoimmune disease असून शरीराची रोगप्रतिकारक व्यवस्था प्रतिक्रिया दर्शवते. विशेषतः साबण, कीटकनाशके किंवा डिटर्जंट्सच्या संपर्कानंतर ही समस्या अधिक वाढू शकते. मात्र पाण्याचा या रोगाशी थेट संबंध नसल्याचेही अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.