Breaking

Hair loss disease : केसगळतीचे लाेण आता नांदुऱ्यापर्यंत !

Hair loss disease reached at Nandura : रुग्णसंख्या पोहोचली १५६ वर

Shegaon Khamgaon शेगाव तालुक्यात सुरू झालेल्या केस गळती आजाराचे लाेण आता शेजारील नांदुरा तालुक्यापर्यत पाेहचले आहे. आराेग्य विभागाच्यावतीने सर्वेक्षण करण्यात येत आहे. रुग्णांची संख्याही सातत्याने वाढतच आहे. आतापर्यंत रुग्णांचा आकडा १५६ वर पाेहोचला आहे.

नांदुरा तालुक्यातील वाडी येथे आणखी सात रुग्ण आढळले. रुग्ण आढळलेल्या गावांमध्ये होमिओपॅथी रिसर्च सेंटर चमू व आरोग्य उपसंचालकांनी सोमवारी भेट दिली. दिल्लीच्या रिसर्च संस्थेने या प्रकरणाची व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे माहिती घेतली. त्यामध्ये आयुर्वेद, युनानी व होमिओपॅथीच्या डॉक्टरांचा समावेश आहे.

Nagpur Police : फायनान्सवर वस्तू घेतली, २२ लाखांनी लुटले !

शेगाव तालुक्यातील ११ गावे, नांदुरा तालुक्यातील वाडी येथे केसगळतीच्या समस्येने नागरिक हैराण झाले आहेत. दिवसेंदिवस बाधित रुग्णांमध्ये वाढ होत आहे. हा प्रकार नेमका कशामुळे होत आहे. याबाबत ठोस पुरावे उपलब्ध नसल्याने विविध आरोग्य संस्था बाधित गावांना भेट देत आहेत.

प्रादेशिक होमिओपॅथी संशोधन संस्थेंतर्गत केंद्रीय होमिओपॅथी संशोधन परिषद, आयुष मंत्रालय भारत सरकार येथील संशोधन अधिकाऱ्यांनी गावांना भेट दिली. अधिकाऱ्यांच्या पथकाने बोंडगाव येथील बाधित रुग्णांकडून त्यांच्या आरोग्याचा इतिहास समजून घेतला. शेगाव तालुक्यातील भोनगाव, माटरगाव येथील सर्वेक्षणात रुग्ण आढळले.

Justice Devendrakumar Upadhyay : प्रलंबित प्रकरणांवर मुख्य न्यायमुर्तीं स्पष्टच बोलले

संशाेधनातून उलगडणार काेड
शेगाव, नांदुरा तालुक्यांत उ‌द्भवलेल्या या प्रकाराची दखल राष्ट्रीय पातळीवर घेण्यात आली आहे. त्यासाठी उद्या, मंगळवारी आयसीएमआर (इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च) चे पथक बाधित गावांमध्ये भेट देणार आहे. त्यासाठी आरोग्य यंत्रणा तयार आहे, अशी माहिती जिल्हा साथरोग अधिकारी डॉ. प्रशांत तांगडे यांनी दिली. केसगळती हा नेमका काय प्रकार आहे, याविषयी संशोधकांना कुतूहल निर्माण झाले आहे. त्यामुळेच दिल्ली येथील रिसर्च सेंटर, मुंबई, दिल्ली, अहमदाबाद, चेन्नईच्या डॉक्टरांच्या चमूने सर्व प्रकाराची व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे माहिती घेतली.