Team of dermatologists reviewing situation : टक्कल पडण्याची साथ; चर्मरोग तज्ज्ञांचे पथक दाखल, तपासणी सुरू
Shegaon केस गळून टक्कल पडण्याची साथ शेगाव तालुक्यातील तीन गावांत आली आहे. त्याची आराेग्य विभागाने गंभीर दखल घेतली आहे. तसेच घराेघरी सर्वेक्षण सुरू केले आहे. आतापर्यंत या सर्वेक्षणात ५१ रुग्ण आढळले आहेत. चर्मरोग तज्ज्ञांचे पथकही दाखल झाले आहे. प्रथम कठोरा, बोंडगाव, हिंगणा या गावात तपासणी सुरू केली आहे. हा फंगल इन्फेक्शनचा प्रकार असल्याची शक्यता आराेग्य विभागाने व्यक्त कलेी आहे.
प्राथमिक आरोग्य केंद्र भोनगाव अंतर्गत बोंडगाव येथे गावातील महिला, पुरूष, लहान मुले, मुली यांचे केस गळत आहेत. हा प्रकार समोर आल्यावर चांगलीच खळबळ उडाली. त्यामुळे गावात वैद्यकीय अधिकारी डॉ. बनकर यांच्या मार्गदर्शनाखाली वैद्यकीय अधिकारी डॉ. शेंगुळे व बोंडगावचे सरपंच रामेश्वर थारकर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये सर्वेक्षण करण्यात आले. त्यामध्ये आरोग्य सहाय्यक सहाय्यक तायडे, आरोग्य सेवक मो. शाहिद, आशा स्वयंसेविका थारकर यांनीही सहभाग घेतला.
Collector of Nagpur : नागपूर विमानतळ विस्तारीकरण प्रकल्प मुदतीपूर्वी पूर्ण करणार !
त्यानंतर ग्राम कठोरा येथे केस गळती झालेल्या रुग्णांचे सर्वेक्षण करण्यात आले. उपस्थित डॉ. राठोड व डाॅ. भोबळे यांनी केस गळतीसंदर्भात गावकऱ्यांच्या शंका-कुशंकांचे निरसन केले. अमूक शॅम्पू लावल्याने, खाऱ्या पाण्याने केस धुतल्याने केस गळत असल्याचे गावकरी बोलत आहेत. याबाबत तिन्ही गावांत भीतीदायक वातावरण तयार झाले आहे.
त्यावर सरपंच संघटनेचे अध्यक्ष रामेश्वर थारकर यांनी शेगाव तालुका आरोग्य अधिकारी दीपाली बायस्कर तसेच साथरोग अधिकारी, जिल्हा आरोग्य अधिकारी, केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव, कामगार मंत्री ॲड. आकाश फुंडकर यांच्याशी चर्चा केली.
घाबरू नका
शेगाव तालुक्यातील तीन गावांत केस गळतीची साथ सुरू आहे. तरीही नागरिकांनी घाबरून जावू नये. आराेग्य विभागाने त्यावर उपाय याेजना सुरू केल्या आहेत. सर्वेक्षणही सुरू झाल्याचे राज्याचे कामगार मंत्री आकाश फुंडकर यांनी सांगितले.
या गावांमध्ये आढळले रुग्ण
बाेंडगाव १६
कालवड १३
कठाेरा ७
भाेनगाव ३
हिंगणा वैजनाथ ६
घुई ७