Anjali Damanias strong displeasure over the political situation : अंजली दमानियां यांची राजकीय परिस्थितीवर तीव्र नाराजी
Mumbai : महाराष्ट्रातील राजकीय परिस्थितीवर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. त्यांनी विविध नेत्यांवर गंभीर आरोप केले, कायदा आणि सुव्यवस्थेच्या ढासळत्या स्थितीबद्दल चिंता व्यक्त केली. माणिकराव कोकाटे यांच्या व्हिडिओ व्हायरल प्रकरणाचा उल्लेख करून त्यांनी त्यांचा राजीनामा मागितला. तसेच ‘हनी ट्रॅप’ प्रकरणाचा तपशील लवकरच देणार असल्याचे स्पष्ट केले आहे.
अंजली दमानिया यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेऊन महाराष्ट्रातील सध्याच्या राजकीय परिस्थितीवर तीव्र नाराजी व्यक्त केली. यावेळी त्यांनी विविध राजकीय नेत्यांवर गंभीर आरोप केले. कायदा आणि सुव्यवस्थेच्या ढासळत्या स्थितीबद्दल चिंता व्यक्त केली. महाराष्ट्रात अत्यंत भयानक आणि विचित्र वातावरण निर्माण झाले आहे. राज्यात कायदा, सुव्यवस्था उरली नसल्याचे सांगत, कायद्याचा धाक फक्त सामान्य लोकांनाच असू शकतो, असे दमानिया म्हणाल्या.
Manikrao Kokate : ‘शासन भिकारी आहे’ कृषीमंत्री कोकाटे यांचे आणखी एक वादग्रस्त वक्तव्य
दमानिया यांनी माणिकराव कोकाटे यांचा भर सभागृहात अधिवेशना दरम्यान मोबाईलवर रम्मी गेम खेळतानाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्या प्रकरणी भाष्य केले. कोकाटे यांचे रम्मी खेळतानाचे दृश्ये व्हायरल झाले होते. त्यानंतर आज त्यांना बोलता येत नव्हते, त्यांचे तत पप होत होते. मोबाईल नंबर काय सांगितला, बोलत असताना त्यांना काही सूचत नव्हते. शेतकऱ्यांची कळवळ आहे. असे म्हणत पत्रकार परिषद सुरू केली.
Maharashtra politics : आईच्या नावाने डान्सबार चालवून पोरी नाचवायला लाज वाटत नाही का?
पण पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर त्यांच्याकडे उत्तर नव्हती. यानंतर त्यांनी त्यांच्यावर केस करेल, असे म्हणत मी दुसरे काही तरी करत होतो. त्यात तो व्हिडिओ आला असे सांगण्याचा प्रयत्न केला. शेतकऱ्यांना संवेदनशील कृषी मंत्री हवे आहेत. त्यांच्यावर कृपा करा आणि तुमचा राजीनामा द्या. ओसाड गावच्या पाटीलाचा राजीनामा मिळालाच पाहिजे, असे अंजली दमानिया म्हणाल्या.
Khadse Vs Mahajan : हिंमत असेल तर ‘त्या’ प्रकरणाची सीबीआय चौकशी करा !
सुरज चव्हाणकडून बेदम मारहाण करण्यात आली. त्यांच्यावर अतिशय गंभीर असे कलम लागले आहे. असे असताना त्यांना अजून अटक झालेली नाही. सुरज चव्हाण यांनी केवळ संघटनात्मक पदाचा राजीनामा दिला आहे. महाराष्ट्र युवक कल्याण मंडळाच्या पदाचा राजीनामा दिलेला नाही. राजीनामे सोडा यांच्यावर कारवाई झाली पाहिजे, आज मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचा वाढदिवस आहे. त्यांना सांगायचे आहे की महाराष्ट्र आता हे खपवून घेणार नाही, असेही अंजली दमानिया यांनी म्हटले.
______