Breaking

Sudhir Mungantiwar : मुनगंटीवारांच्या मागणीवर ‘हनुमंतांनी’ दिले आश्वासन !

‘Hanumant’ gave assurance on Mungantiwar’s demand : उद्या संध्याकाळपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार धान खरेदीचे पैसे

Chandrapur : धान उत्पादक शेतकऱ्यांना त्यांचे पैसे लवकरात लवकर मिळावे, यासाठी तत्कालीन वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री आणि विद्यमान आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी सातत्याने पाठपुरावा केला होता. आताही त्यांनी हा विषय लाऊन धरला आहे. याबाबतची मागणीवजा सूचना त्यांनी महाराष्ट्र राज्य सहकार पणन महासंघाचे व्यवस्थापकीय संचालक हनुमंत पवार यांना केली. आणि हनुमंत पवार यांनी आमदार मुनगंटीवार यांना आश्वासन दिले.

उद्या (६ फेब्रुवारी) सायंकाळपर्यंत चंद्रपूर जिल्ह्यातील धान उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यात त्यांचे थकीत असलेले पैसे जमा होणार आहेत. याच संदर्भात आमदार मुनगंटीवार यांनी अन्न नागरी पुरवठा विभागाच्या सचिव जयश्री भोज यांच्याशीदेखील चर्चा केली. त्यांनी या विषयात सकारात्मक प्रतिसाद दिला. चंद्रपूर जिल्हयातील एकुण १६,६६९ धान उत्पादक शेतकऱ्यांचे धान खरेदीचे रुपये ९३ कोटी ९० लाख रक्कम थकीत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र असंतोष आहे.

Minister Akash Fundkar : बांधकाम कामगारांची नोंदणी आता ऑनलाईन!

थकित पैसे मिळण्याबाबत अनेक शेतकऱ्यांनी आमदार सुधीर मुनगंटीवार यांची भेट घेत त्यांची कैफियत मांडली. त्यावर त्यांनी यासंदर्भात महाराष्ट्र राज्य सहकारी पणन महासंघ मुंबईचे व्यवस्थापकीय संचालक हनुमंत पवार यांच्याशी त्वरित संपर्क साधला व चर्चा केली. शेतकरी प्रचंड आर्थिक अडचणीत आहेत. त्यामुळे याविषयी संवेदनशीलपणे कार्यवाही करावी असे आमदार मुनगंटीवार यांनी पवार यांना सांगितले. हनुमंत पवार यांनी 6 फेब्रुवारी रोजी संध्याकाळपर्यंत शेतकऱ्यांच्या हक्काचे पैसे त्यांच्या खात्यात जमा करण्यात येईल, असे आश्वासन आमदार सुधीर मुनगंटीवार यांना दिले.

Sudhir Mungantiwar : सुधीरभाऊंचं लक्ष प्रशासन दक्ष!

शेतकऱ्यांना लवकरच त्यांचे थकलेले पैसे मिळणार आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंद आहे. प्रत्येक लोकप्रतिनिधीने आमदार मुनगंटीवार यांच्याप्रमाणे शेतकऱ्यांच्या अडचणी समजून घेऊन तात्काळ कार्यवाही केल्यास शेतकऱ्यांना मोठी मदत होऊ शकते, अशा भावना शेतकऱ्यांनी व्यक्त केल्या.