Breaking

Harish Pimpale : भाजप आमदारावर आली होती आंदोलनाची वेळ; अधिकाऱ्यांमुळे टळला प्रसंग

Railway administration’s positive decision on MLA Harish Pimple’s demands for Murtijapur railway station : मूर्तिजापूर रेल्वे स्थानकासाठी आमदार हरीश पिंपळे यांच्या मागण्यांवर रेल्वे प्रशासनाचा सकारात्मक निर्णय

Akola : जिल्ह्यातील इंग्रजकालीन रेल्वे जंक्शन असलेल्या मूर्तिजापूर रेल्वे स्थानकाच्या महत्त्वात घट होत असल्याचा आरोप करत, भाजप आमदार हरीष पिंपळे यांनी पाच रेल्वे गाड्यांना मूर्तिजापूर स्थानकावर थांबा देण्याची मागणी केली होती. त्यासाठी आंदोलन करण्याचा इशाराही दिला होता. मात्र अधिकाऱ्यांच्या प्रसंगावधानाने सत्ताधारी आमदारावर आलेली आंदोलनाची वेळ टळली.

मूर्तिजापूर हे वाशीम आणि अमरावती जिल्ह्यातील काही गावांसाठी महत्त्वाचे रेल्वे स्थानक आहे. या स्थानकासाठी आमदार पिंपळे यांनी काही मागण्या केल्या होत्या. त्यासाठी रेल्वे रोको आंदोलनाचा इशाराही दिला होता. मात्र, रेल्वे प्रशासनाने सकारात्मक भूमिका घेत तीन रेल्वेगाड्यांना थांबा देण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे रेल्वे रोको आंदोलन स्थगित करण्यात आले आहे. उर्वरित दोन गाड्यांच्या थांब्यासाठीही प्रयत्न सुरू राहतील, असे आमदार पिंपळे यांनी सांगितले.

Shiv Sena : बॅनरवर आनंद दिघे म्हणून चक्क अभिनेते प्रसाद ओकचा फोटो!

मूर्तिजापूर तालुका अकोला आणि अमरावती जिल्ह्यांना जोडणारा महत्त्वाचा केंद्रबिंदू आहे. येथे रेल्वे जंक्शन असल्याने मोठ्या प्रमाणावर विद्यार्थी, प्रवासी आणि रुग्णालयात जाणाऱ्या रुग्णांसाठी रेल्वे सेवा अत्यंत महत्त्वाची आहे. कारंजा (जिल्हा वाशीम ), दर्यापूर (जिल्हा अमरावती) तसेच इतर ग्रामीण भागांतील नागरिकांना रेल्वे सुविधेचा लाभ मिळावा, यासाठी आमदार पिंपळे यांनी ही मागणी केली होती.

मूर्तिजापूर तालुक्यातील अनेक विद्यार्थी अकोला आणि अमरावती येथे शिक्षणासाठी प्रवास करतात. तसेच, अनेक नागरिक वैद्यकीय उपचारांसाठी मोठ्या दवाखान्यांत जातात. नवीन रेल्वे थांब्यामुळे विद्यार्थ्यांना आणि रुग्णांना मोठा दिलासा मिळेल, असा विश्वास आमदार पिंपळे यांनी व्यक्त केला आहे.

Akash Fundkar : सातकलमी कृती कार्यक्रमाची काटेकोर अंमलबजावणी करा!

या निर्णयामुळे मुर्तिजापूर आणि परिसरातील हजारो नागरिकांना थेट फायदा होणार आहे. उर्वरित दोन रेल्वे गाड्यांच्या थांब्यासाठीही प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. भविष्यात हा निर्णय मूर्तिजापूर तालुका आणि परिसरातील नागरिकांसाठी मोठ्या प्रमाणावर फायदेशीर ठरेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे.