Breaking

Harshawardhan Deshmukh : श्री शिवाजी शिक्षण संस्था मेडिकलच्या जागा वाढवून २०० करणार !

Harshvardhan Deshmukh confident that Shri Shivaji Shikshan Sanstha will increase medical seats to 200 : लवकरच मान्यता मिळेल, हर्षवर्धन देशमुख यांना विश्वास

Amravati : विदर्भातील सर्वात मोठी आणि महाराष्ट्रातील द्वितीय क्रमांकाची श्री शिवाजी शिक्षण संस्थेने यावर्षीच्या अंदाजपत्रकात ९०० कोटी ५० लाख खर्चाच्या अंदाजपत्रकाला मंजुरी दिली आहे. संस्थेच्या शाळा व महाविद्यालयांच्या सक्षमीकरणावर विशेष भर देण्यात आला आहे. भौतिक विकासासह डिजिटलायझेशनसारख्या सुविधा समाविष्ट करण्यात आल्या आहेत.

संस्थेच्या मातोश्री विमलाबाई देशमुख सभागृहात झालेल्या या आमसभेत संस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धन देशमुख यांनी २०२४-२५ या आर्थिक वर्षाचा आढावा घेत आगामी वर्षाचे अंदाजपत्रक सादर केले. उपस्थित सर्व सदस्यांनी अंदाजपत्रकाला एकमताने मंजुरी दिली. डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती वैद्यकीय महाविद्यालय व श्री शिवाजी कृषी महाविद्यालय यांनी अनुक्रमे ‘नॅक’ आणि कृषी शिक्षण अधिस्वीकृती मंडळ (नॅब) यांच्या अधिस्वीकृती मिळविल्या आहेत.

Namdeo Kirsan : घराजवळचा रस्ता खोदून ठेवला, तरीही खासदार ढिम्मच !

श्री शिवाजी सायन्स महाविद्यालय, अमरावतीने एनआयआरएफच्या देशातील पहिल्या १०० महाविद्यालयांमध्ये स्थान मिळवत ९९वे रँकिंग प्राप्त केले. संस्थेच्या वैद्यकीय महाविद्यालयासाठी पदवी अभ्यासक्रमाच्या ५० जागा वाढवून २०० करण्याचा तसेच पदव्युत्तर जागा वाढविण्याचा प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. लवकरच याला मान्यता मिळेल, असा विश्वास संस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धन देशमुख यांनी व्यक्त केला.

आजीवन सभासद नोंदणी प्रक्रिया लवकरच सुरू..
संस्थेच्या आजीवन सभासदत्वासंदर्भातील प्रक्रिया सुरू झाली आहे. लवकरच अंमलबजावणी होईल, असेही हर्षवर्धन देशमुख यांनी स्पष्ट केले. यावेळी सभासदांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना समाधानकारक उत्तरे देण्यात आली.

Nana Patole : अवैध हुक्का पार्लरवरून नाना पटोले आक्रमक

शहीदांना व माजी अध्यक्षांना श्रद्धांजली..
सभेच्या दिवशी शहीद दिन आणि माजी अध्यक्ष कै. रावसाहेब इंगोले यांच्या जयंतीदिनी त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. तसेच संस्थेच्या या वर्षीच्या दिवंगत सदस्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. आमसभेला संस्थेचे उपाध्यक्ष अॅड. गजाननराव पुंडकर, अॅड. जे. व्ही. पाटील पूसदेकर, केशवरराव मेतकर, कोषाध्यक्ष दिलीप इंगोले, कार्यकारिणी सदस्य हेमंत काळमेघ, प्राचार्य केशवराव गावंडे, सुरेशराव खोटरे, प्रा. सुभाषराव बनसोड, सचिव डॉ. वि. गो. ठाकरे, स्वीकृत सदस्य प्राचार्य डॉ. अंबादास कुलट, नरेशचंद्र पाटील, डॉ. पी. एस. वायाळ, डॉ. अमोल महल्ले आणि आजीवन सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.