Congress state president Harshvardhan Sapkal sharply criticizes the Mahayuti government : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची महायुती सरकारवर सडकून टीका
Nagpur : भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची युती होऊन सरकार तयार झाले. त्यानंतर अजित पवार जोडले गेल्यानंतर युतीची महायुती झाली आणि ट्रीपल इंजीन सरकार आले. पण आता या गॅंग ऑफ ट्रीपल इंजीनमध्ये गॅंग वॉर सुरू होणार आहे, अशी खोचक टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली.
काँग्रेसच्या सद्भावना यात्रेसाठी आज (१६ एप्रिल) हर्षवर्धन सपकाळ नागपुरात आले होते. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, अजित पवार यांचे युतीमध्ये सामील होणे, ही सत्तेसाठी एकत्र आल्याची तडजोड आहे. त्यांना विचारांशी काही देणं घेणं नाही. यामध्ये सौजन्याची ऐसीतैसी होणार आहे. या ट्रीपल इंजीन सरकारमध्ये आता टोळीयुद्ध पाहायला मिळणार आहे.
Fake disability certificate : बदल्यांमध्ये अन्याय; दिव्यांग शिक्षक आक्रमक!
अजित पवार हे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत आहेत. दुसरीकडे काकांवर त्यांचे प्रेम आहे, असं सांगतात. या दोन्ही परस्परविरोधी बाजू आहेत. शरद पवार हे शाहू फुले आंबेडकर विचारांचे आहे. ते कुठल्याही परिस्थितीत भाजपच्या सोबत जाणार नाहीत. ते महाविकास आघाडीसोबतत असणार आहेत. त्यामुळे अजित पवार यांना त्यांची भूमिका स्पष्ट करावी लागणार आहे, असे सपकाळ म्हणाले.
Prahar Janshakti : आमदाराच्या स्वीय सहायकाची आंदोलकांना मारहाण!
महाराष्ट्रभरात आम्ही सद्भावना यात्रा काढत आहोत. शांततेच्या प्रयत्नांना जर कोणी अडवत असेल तर हे दुर्दैवी आहे. देशात शांतता नांदावी, सौजन्य समन्वयाची भावना रुजावी, असा आमचा प्रयत्न आहे. यापूर्वीही आम्ही नागपुरात महाल परिसरात पाहणीसाठी जाणार होतो. पण तेव्हा आमच्या पाहणी दौऱ्यावर बंदी घालण्यात आली होती. किमान शांतीच्या प्रयत्नांवर तरी बंदी घालू नये, असेही हर्षवर्धन सपकाळ म्हणाले.








