Harshawardhan Sapkal : रावणासारखीच संघाची दहा तोंडे !

Congress Leader Attacks RSS said Ten Faces Like Ravan : निसर्ग नियती त्यांना सद्बबुद्धी देवो, त्यासाठी संविधान सत्याग्रह पदयात्रा

Nagpur : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षाची ही सुरूवात आहे आणि याच्याच सुरूवातीला आम्ही संविधान सत्याग्रह पदयात्रा काढत आहोत. २ ऑक्टोबरला दसऱ्याच्या दिवशी रावणाचे दहन होणार आहे. रावणाचे दहन म्हणजे ते व्यक्तीचे दहन नव्हे तर दृष्ट प्रवृत्तीचे दहन आहे. रावणाप्रमाणेच संघाचीही दहा तोंडं आहेत. ही तोंड दहाही दिशांनी होण्याआधी त्या दहाही तोडांचं दहन केले पाहिजे, असा हल्लाबोल काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला आहे.

संविधान सत्याग्रह पदयात्रेसाठी हर्षवर्षन सपकाळ नागपुरात आले असता त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, निसर्ग नियती त्यांना सद्बबुद्धी देवो, यासाठी आम्ही ही पदयात्रा काढली आहे. संविधानाला अपेक्षित असलेल्या भारतासाठी प्रत्येकाने या यात्रेमध्ये सहभागी झाले पाहिजे. या संविधान सत्याग्रह यात्रेत प्रत्येक भारतीय नागरिकापर्यंत संविधानाचे सत्य पोहोचवण्यासाठी आम्ही यात सहभागी झालो आहोत. जनतेनेही मोठ्या संख्येने या यात्रेत सहभागी झाले पाहिजे.

Shivsena Leader : प्रश्न विचारले तरी सरकारला झोंबतात !

या यात्रेमध्ये शिवसेना (उद्धव ठाकरे) नेत्या सुषमा अंधारे, राज्याचे माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरदचंद्र पवार) नेते अनिल देशमुख, काँग्रेसचे आमदार व नागपूर शहराध्यक्ष विकास ठाकरे यांच्यासह काँग्रेसचे सर्व वरिष्ठ नेते, सर्व ब्लॉक अध्यक्ष, माजी नगरसेवक, महिला काँग्रेस, युवक काँग्रेस, सेवादलचे पदाधिकारी सहभागी होणार असल्याची माहितीही सपकाळ यांनी दिली.

Constitution Satyagraha March : तुषार गांधी यांच्या नेतृत्वात संविधान सत्याग्रह पदयात्रा सुरू !

यात्रेमध्ये सहभागी झालेले अनिल देशमुख यावेळी म्हणाले की, महात्मा गांधी यांचे नातू तुषार गांधी यांच्यासह सर्व नेते यात्रेमध्ये सहभागी झाले आहेत. सामाजिक न्याय, शांतता आणि संविधानावर होणारे हमले वाचवण्यासाठी हा यात्रा आहे. सामाजिक प्रश्नांची उकल या संविधान यात्रेतून होणार आहे. जनतेचे प्रश्न जाणून घेण्याचे काम तुषार गांधी करणार आहेत.