Congress leader Rahul Gandhi worked to bring the Election Commission to its knees : राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगाला वठणीवर आणण्याचं काम केलं
Nagpur : निवडणूक आयोग मतांची चोरी करतोय, हे सांगत राहुल गांधी यांनी देशभरात चळवळ उभी केली. त्यानंतर त्यासंदर्भात विविध पुरावे सादर केले. ‘गली गली मे चोर है – चुनाव आयोग चोर है’, हा नारा लोकांपर्यंत व्यवस्थित पोहोचल्याने उशिरा का होईना निवडणूक आयोग पुढे येत आहे. खऱ्या अर्थाने निवडणूक आयोगाला वठणीवर आणण्याचं काम राहुल गांधी यांनी केलं आहे, असे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटले आहे.
यासंदर्भात प्रदेशाध्यक्ष सपकाळ म्हणाले, राहुल गांधी यांनी भाजप सरकारला जातनिहाय जनगणना करण्यात भाग पाडले. कारण आम्ही जातनिहाय जनगणना करणार नाही, असं आरएसएस आणि केंद्र सरकार आधी स्पष्टपणे म्हणत होते. पण राहुल गांधींच्या तडाख्यानंतर त्यांना जातनिहाय जनगणनेचा निर्णय जाहीर करावा लागला. मुख्यमंत्र्यांचा संताप समजण्यासारखा आहे. कारण जो माणूस मतांच्या चोरीतून मुख्यमंत्री होतो आणि जनताच आता हे बोलू लागली आहे. त्यामुळे त्यांचा तीळपापड झाला आहे आणि वड्याचं तेल वांग्यावर काढण्याचं काम सुरू आहे.
Sangram Jagtap : आमदार संग्राम जगताप यांच्या विरोधात विधानसभा अध्यक्षांकडे तक्रार
जैन बोर्डींग प्रकरणाबाबत सपकाळ म्हणाले की, जैन बोर्डींगचा केवळ व्यवहार रद्द करून चालणार नाही, तर साडेतीन एक जमीन गिळंगृत करू पाहणारे जे भाजपचे खासदार केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ होते, त्यांचा राजीनामा घेतला गेला पाहिेजे. तसेही आज ना उद्या हा व्यवहार रद्द झालाच असता. आता केवळ मोहोळ यांना वाचवण्यासाठी हा करार रद्द करण्याचा सत्ताधाऱ्यांचा खटाटोप चाललेला आहे. याच्यात दोष कुणाचा होता, येवढी अनिमितता कशी झाली. मुख्यमंत्र्यांचा नातेवाईक असलेल्या धर्मदाय आयुक्ताने नियम डावलून परवानगी कशी दिली, याची चौकशी करून या सर्वांवर कारवाई झाली पाहिजे, असेही हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटले आहे.








