Congress to take out Sadbhavana Yatra : खामगाव येथे २६ एप्रिलला संकल्प सभा, सद्भावना यात्रा काढणार
Buldhana देशात आणि राज्यात सध्या जातीय आणि धार्मिक द्वेषाचे वातावरण पसरत आहे. अशा परिस्थितीत समाजात ऐक्य व बंधुभाव टिकवण्यासाठी ‘सद्भावना संकल्प सभा’ आणि ‘संविधान बचाव रॅली’चे आयोजन करत असल्याचे काँग्रेसने म्हटले आहे. बुलढाणा जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने ही सभा शनिवार, २६ एप्रिल रोजी सकाळी खामगाव येथील संत तुकाराम महाराज सभागृहात आयोजित करण्यात आली आहे.
या सभेला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन दादा सपकाळ प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. त्यांच्या सोबत अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव कुणालजी चौधरी व जिल्हा निरीक्षक राजेंद्रजी राख यांचीही विशेष उपस्थिती राहणार आहे.
Harshawardhan Sapkal : सरकारने जैन बांधवांच्या भावना पायदळी तुडवल्या!
कार्यक्रमात आमदार धीरज लिंगाडे, माजी आमदार राजेश एकडे, माजी आमदार राणा दिलीपकुमार सानंदा, प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष अॅड. गणेशराव पाटील, सरचिटणीस शामभाऊ उमाळकरयांच्यासह विविध पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी होणार आहेत.
जिल्हाध्यक्ष राहुल भाऊ बोंद्रे आणि प्रदेश प्रतिनिधी ज्ञानेश्वर पाटील यांनी सर्व काँग्रेस कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांना मोठ्या संख्येने सभेला उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.








