Harshawardhan Sapkal : काँग्रेसचे पुन्हा एकदा ‘संविधान बचाव’!

Congress’s Samvidhan Bachav Yatra across Maharashtra : ‘सद्भावना यात्रा’ही काढणार; ‘पदे असणाऱ्यांना पक्षासाठी वेळ द्यावा लागेल’

Mumbai संविधान बचाव अभियानाने काँग्रेसला २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत दणदणीत यश मिळवून दिलं. काँग्रेसची केंद्रात सत्ता आली नाही, पण भाजपबद्दलची नाराजी स्पष्ट झाली. त्यानतंर विधानसभेत काँग्रेसला मोठा फटका बसला. आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वी काँग्रेसने पुन्हा एकदा संविधान बचावचा नारा दिला आहे.

अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या निर्देशानुसार राज्यात संविधान बचाव यात्रा तसेच महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी आयोजित सद्भावना यात्रा काढण्यात येणार आहेत. २९ एप्रिलला नाशिक येथे सद्भावना यात्रेचे आयोजन केले असून १ मे रोजी सद्भावना सत्याग्रह तर ४ व ५ मे रोजी परभणी येथे सद्भावना यात्रा व संविधान बचाव यात्रेचे आयोजन केले आहे, अशी माहिती प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी दिली आहे.

Statehood for Vidarbha : १ मे हा विदर्भासाठी काळाच दिवस; विदर्भवाद्यांची भूमिका

टिळक भवन दादर येथे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या अध्यक्षतेखाली काँग्रेस पक्षाच्या प्रदेश कार्यकारिणीची बैठक पार पडली. बैठकीनंतर सपकाळ यांनी पत्रकारांशी संवाद साधला. अखिल भारतीय काँग्रेस कमिटीने २०२५ हे वर्ष संघटन वर्ष घोषीत केली आहे. त्याअनुषंगाने संघटना मजबूत करण्यावर भर दिला जाणार आहे. पक्षाची पदे असणाऱ्यांना पक्षासाठी वेळ द्यावा लागेल. जिल्हाध्यक्षांनी महिन्यातून किमान १० पूर्ण दिवस वेगवेगळ्या ब्लॉकमध्ये फिरावे. पक्षाने दिलेल्या आंदोलनात्मक कार्यक्रमांची अंमलबजावणी करावी, महिन्यातून किमान १ बैठक घेतली पाहिजे, असंही ते म्हणाले.

Nail loss disease : आमचे रक्त, केस आणि नखं तुम्ही नेता तरी कुठे?

ब्लॉक अध्यक्षांनी महिन्यातून किमान ८ पूर्ण दिवस प्रभागांमध्ये फिरावे. जिल्हा काँग्रेसच्या आंदोलनात सहभागी व्हावे. महिन्यातून किमान १ बैठक घ्यावी. प्रदेश पदाधिकाऱ्यांनी नेमून दिलेल्या जिल्ह्यात महिन्यातून किमान ६ पूर्ण दिवस दौरे करावे. दोन दिवस प्रदेश कार्यालयाने दिलेली जबाबदारी पूर्ण करावी. महिन्याच्या १० तारखेला प्रदेश कार्यालयाला अहवाल सादर करावा. कोणत्याही संयुक्तीक कारणांशिवाय सलग ३ बैठकांना गैरहजर राहिल्यास त्या पदाधिकाऱ्याला कार्यमुक्त केले जाईल, असे प्रदेशाध्यक्षांनी सांगितले.