Breaking

Harshawardhan Sapkal : सपकाळांची नियुक्ती, काँग्रेस नेत्याचा सर्व पदांचा राजीनामा

District Congress leader resigned from all posts : जिल्हा काँग्रेसमध्ये खदखद; शिंदेसेनेत जाणार असल्याची चर्चा

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष तसेच जिल्हा काँग्रेसचे माजी अध्यक्ष विजय अंभोरे यांनी आपल्या सर्व पदांचा राजीनामा जाहीर केला. स्थानिक पत्रकार भवन येथे झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी प्रदेश उपाध्यक्ष आणि अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या सदस्य पदाचा राजीनामा देत असल्याचे स्पष्ट केले. कार्यकर्त्यांसोबत चर्चा करून पुढील राजकीय भूमिका ठरविणार असल्याचेही त्यांनी नमूद केले. त्याचवेळी ते शिंदे सेनेत जाणार असल्याचीही चर्चा आहे.

खासदार मुकुल वासनिक यांच्या नेतृत्वात काँग्रेसमध्ये प्रवेश घेतल्यानंतर विजय अंभोरे यांनी अनेक महत्त्वाची पदे भूषवली. बुलढाणा जिल्हा काँग्रेसचे सात वर्षे अध्यक्षपद सांभाळताना पक्षाला जिल्ह्यात चांगले यश मिळवून दिल्याचा दावा त्यांनी केला.

Forest Department : एक वर्षाच्या बिबट्याला वन विभागाकडून जीवदान!

पत्रकार परिषदेत विजय अंभोरे यांना विचारले की, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या नियुक्तीमुळे त्यांनी राजीनामा दिला का? यावर ते म्हणाले, “त्यांनी पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी मेहनत घेतली आहे आणि काँग्रेसच्या वरिष्ठांनी त्यांना हे पद दिले आहे. त्यामुळे माझी त्यांच्याविषयी कोणतीही नाराजी नाही.”

तथापि, त्यांच्या राजीनाम्यानंतर जिल्हा काँग्रेसमध्ये उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे. पक्षश्रेष्ठींनी सपकाळ यांची नियुक्ती केल्यानंतर अंभोरे यांनी अचानक राजीनामा दिल्याने त्यांच्या असंतोषाबाबत तर्क-वितर्क लावले जात आहेत.

आपण कोणत्या पक्षात जाणार किंवा स्वतंत्र राजकीय वाटचाल करणार का, असा प्रश्न विचारल्यावर अंभोरे म्हणाले की, “कार्यकर्त्यांशी चर्चा करून पुढील निर्णय घेणार आहे.” त्यांच्या या वक्तव्यामुळे आगामी राजकीय हालचालींकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. पत्रकार परिषदेला मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते, त्यामुळे अंभोरे यांच्या निर्णयाचे भविष्यात पक्षावर काय परिणाम होतील, याची चर्चा बुलढाणा जिल्ह्यात रंगली आहे.

Chandrashekhar Bawankule : होय..! जयंत पाटलांना माझ्या बंगल्यावर भेटलो, पण..

दरम्यान, विजय अंभाेरे हे शिंदे सेनेत प्रवेश करणार असल्याची चर्चा सुरू आहे. सपकाळ यांच्याबराेबर विचार जुळत नसल्याने अंभाेरे यांनी वेगळी वाट निवडल्याची चर्चा आहे.