Breaking

Harshawardhan Sapkal : कर्नल सोफीयांबद्दल अपमानजनक बोलणाऱ्या मंत्र्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा !

File a case of sedition against the minister who spoke derogatorily about Colonel Sophia : विजय शाह याला भाजपने तात्काळ मंत्रिपदावरून आणि पक्षातून हाकलून दिले पाहिजे

Mumbai : ज्यांनी आमच्या बहीणींचे कुंकू पुसले होते, मोदींनी त्यांच्याच बहीणीला पाठवून त्यांना उद्ध्वस्त केले, असे वक्तव्य मध्य प्रदेशचे भाजपचे नेते मंत्री विजय शाह यांनी कर्नल सोफिया कुरैशी यांच्याबद्दल केले. त्यानंतर शाह यांच्याविरोधात देशभर संतापाची लाट उसळली. हा देशाच्या सन्मानाचा प्रश्न आहे. अशा मंत्र्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा आणि त्यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे.

यासंदर्भात सपकाळ म्हणाले, कर्नल सोफिया यांच्याबद्दल अत्यंत घाणेरडी भाषा वापरणारा भाजपचा मध्य प्रदेशातील मंत्री विजय शाह याला भाजपने तात्काळ मंत्रिपदावरून आणि पक्षातून हाकलून दिले पाहिजे. पण असे न करता भाजपचे केंद्रीय नेतृत्व त्यांना पाठीशी घालत आहेत. उच्च न्यायालयाने त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे निर्देश दिलेले असतानाही विजय शाह निर्लज्जपणे सर्वोच्च न्यायालयात जातात, हे योग्य नाही.

Centre of Indian trade unions : देशभरातील कामगारांचा श्रम संहितेच्या विरोधात एल्गार!

काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा ताफा अडवला गेला. यासंदर्भात बोलताना सपकाळ म्हणाले, लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी बिहारमध्ये ‘पलायन रोको – नोकरी दो’, या अभियानासाठी जात असताना त्यांचा ताफा पोलिसांनी अडवला. यातून सत्तेचा माज दिसतो आहे. विद्यार्थ्यांशी संवाद साधण्यासाठी जाणे, हा गुन्हा आहे का? पण भाजप सरकार लोकशाही मानत नाही, असेच आजच्या एकंदर परिस्थितीवरून दिसत आहे. हा सर्व प्रकार तानाशाहीचा आहे. मुलभूत अधिकारांवर घाला घालणारा आहे. काँग्रेस याचा निषेध करत आहे.

Chandrashekhar Bawankule : लीज संपलेल्या खाणपट्ट्यांवर चौकशीचा बडगा

ज्यांची जेवढी लोकसंख्या, तेवढी त्यांची भागीदारी या तत्वानुसार राहुल गांधी यांनी जातिनिहाय जनगणनेची मागणी केली. भाजपने सतत या मागणीला विरोध केला. पण नाईलाजाने भाजप सरकारने ती मान्य केली. जातिनिहाय जनगणनेनुसार सर्वच समाज घटकांचा आरक्षणाचा प्रश्न सुटू शकतो. सरकारने जनगणनेचा कालबद्ध कार्यक्रम जाहीर करावा आणि तेलंगणा व कर्नाटक पॅटर्न राबवावा, अशी मागणी हर्षवर्धन सपकाळ यांनी केली.