Harshvardhan Sapkal alleges BJP government’s plan to end the language of Hindavi Swarajya : हिंदवी स्वराज्याची भाषा संपवण्याचा भाजप सरकारचा डाव
Mumbai : केंद्र सरकारने मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला. त्याचे सर्वत्र स्वागत झाले, ते झालेही पाहिजे. पण त्यानंतर काहीच दिवसांत हिंदी भाषेची सक्ती करणे योग्य नाही. हा भाजप सरकारचा दुटप्पीपणा आहे. हा प्रकार आम्ही महाराष्ट्रात चालू देणार नाही. हिंदवी स्वराज्याची भाषा संपवण्याचा हा डाव आम्ही हाणून पाडू, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्षन सपकाळ म्हणाले.
हिंदीची सक्ती करताच महाराष्ट्र नवनिर्माण सेना, माकप आणि काँग्रेसने त्याविरोधात तलवारी उपसल्या. हा विरोध आणखी वाढण्याची शक्यता आहे. मराठी भाषेवर घाला म्हणजे महाराष्ट्राची अस्मिता आणि संस्कृतीवर हल्ला आहे. विविधतेत एकता ही ओळख कुणीही पुसू शकत नाही. भाजप सरकारचा हा डाव यशस्वी होऊ देणार नाही. हिंदी भाषेची सक्ती करण्याचा निर्णय चुकीचा आहे. हा निर्णय सरकारने त्वरीत मागे घ्यावा, अशी मागणी हर्षवर्धन सपकाळ यांनी केली.
Yavatmal Administration : नदी काठावरील गावांमध्ये पाणी टंचाई!
मुंबईतील टिळक भवन येथे हर्षवर्धन सपकाळ यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले, ग्रामीण भागातील पहिलीपासूनच्या विद्यार्थ्यांना सद्यस्थितीत इंग्रजी भाषेचे बर्डन आहे. साधी मराठी शिकवताना शिक्षकांची दमछाक होते. त्यासाठी सरकारला विविध उपक्र राबवावे लागतात. आता एकाच वेळी तीन भाषांची सक्ती केल्यावर विद्यार्थी इतर विषयांचा अभ्यास कसे करतील, हा प्रश्न उपस्थित होतो आहे. फक्त विद्यार्थ्यांसाठीच नव्हे तर शिक्षकांसाठीही ही गोष्ट अवघड ठरणार आहे. विद्यार्थी मुलभूत ज्ञानापासून वंचित राहण्याची भीती निर्माण झाली आहे.
Education Department Scam : घोटाळा झाला नागपूरला, शॉक बसला वर्ध्याला!
मराठीसोबतच इतर भाषांबद्दलही आम्हाला आदर आहे. पण सक्ती करणे चुकीचे आहे. या निर्णयामुळे इतर भाषांच्या शिक्षकांच्या नोकऱ्यांवर गदा येऊ शकते. भाजपला प्रादेशिक संस्कृती संपवायच्या आहेत का, असा सवाल सपकाळ यांनी केला. हिंदू, हिंदी व हिंदूराष्ट्र लादण्याचा भाजपचा अजेंडा दिसतोय. त्यामुळे अशा सक्तीला आमचा विरोध आहे, असेही ते म्हणाले.